ताळगाव बेकायदेशीर जमाव प्रकरणी सिसिल रॉड्रिग्स आणि ४ जणांना दिलासा…

खटला न्यायालयाने फेटाळला

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : ताळगाव ग्रामपंचायतीच्या तक्रारीवरून जेएमएफसी न्यायालयाने नवीन पंचायत घराच्या बांधकामासाठी ताळगावच्या शेतजमिनीत भराव टाकताना बेकायदेशीर जमाव केल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय युवा शाखेच्या अध्यक्षा सिसिल रॉड्रिग्स आणि ताळगावच्या चार पंच सदस्यांवर दाखल केलेला खटला फेटाळून लावला आहे.
हेही वाचा:सिक्वेरांच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने…

असा ‘दावा’ एफआयआरमध्ये करण्यात आला

ताळगावचे माजी सरपंच आग्नेलो दा कुन्हा आणि पंचायत सचिव यांनी मिळून २७ मे २०२० या दिवशी पणजी पोलीस स्थानकात आपच्या सिसिल रॉड्रिग्स आणि ताळगावातील चार नागरिकांविरुद्ध एफआयआर दाखल केली होती. रॉड्रिग्स आणि ताळगावातील चार नागरिक बेकायदेशीरपणे एकत्र जमून कामात अडथळा आणत होते असा दावा एफआयआरमध्ये करण्यात आला होता.
हेही वाचा:ड्रग्ज प्रकरणी ‘हिलटॉप’च्या स्टीव्ह डिसोझाला तेलंगणा पोलिसांकडून अटक…

शिक्षा होण्यापासून मुक्त करण्यात आले

न्यायालयाने रॉड्रिग्स आणि ताळगाव येथील चार नागरिकांविरुद्धचा खटला फेटाळून लावला आहे. तसेच न्यायालयाने घोषित केले आहे, की या आरोपींवरील भविष्यातील सर्व प्रक्रिया थांबवण्यात आली असून सर्व आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम १४३ आणि ३४१ नुसार शिक्षा होण्यापासून देखील मुक्त करण्यात आले आहे.
हेही वाचा:Women’s Asia Cup 2022 : महिला आशिया चषक २०२२चे ‘वेळापत्रक’ जाहीर…

पोलिस घटनास्थळी आल्यानंतर सर्वजण तेथून निघून गेले

“रॉड्रिग्स आणि ताळगाव येथील चार नागरिक बेकायदेशीर उपक्रमाचा भाग असल्याचे किंवा बेकायदेशीर जमाव केल्याचा काही ठोस पुरावा नाही. घटनास्थळी पाच पेक्षा जास्त लोक होते, यावरून ते बेकायदेशीर असल्याचे सूचित होत नाही”, असे न्यायालयाने आयपीसीच्या कलम १४३ अंतर्गत रॉड्रिग्स आणि ताळगावच्या चार नागरिकांविरुद्ध केलेल्या दाव्याला प्रतिसाद देताना जाहीर केले आहे. न्यायालयाने पुढे म्हटले आहे की, “घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी फक्त हातात फलक, बॅनर धरले होते आणि ते घोषणा देत होते. कोणत्याही परिस्थितीत, याचा अर्थ गुन्हेगारी शक्ती दाखविणे असा लावला जाऊ शकत नाही. खरे तर, साक्षीदारांनी त्यांच्या जबानीत नमूद देखील केले आहे की, पोलिस घटनास्थळी आल्यानंतर सर्वजण तेथून निघून गेले होते”. पोलिसांनी आदेश दिल्यानंतर जमावाने जाण्यास नकार दिला किंवा अधिकार्‍यांना कोणताही प्रतिकार केलेला दावा या घटनेत नाही. यावरून असे दिसून येते की घटनास्थळी जमलेल्या लोकांचा कोणताही गुन्हेगारी हेतू नव्हता, असे न्यायलयाने पुढे नमूद केले आहे.
हेही वाचा:Asia Cup 2022 : टीम इंडियाचा ‘महिला संघ’ जाहीर…

ग्रामपंचायतीच्या दादागिरीला सामोरे जाण्यास घाबरत नाही

“आम्ही ताळगावचे नागरिक अशाचप्रकारे अन्यायाविरोधात आवाज उठवत राहू आणि ताळगावची जमीन, डोंगर, समुद्रकिनारा, खाडी तसेच येथील शेतीच्या रक्षणासाठी लढत राहू. ताळगाव ग्रामपंचायतीच्या दादागिरीला सामोरे जाण्यास आम्ही घाबरत नाही”, असे रॉड्रिग्स यांनी सांगितले.
हेही वाचा:सर्वच सरकारी खात्यांना सक्तीची निवृत्ती लागू …

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!