म्हापशातील ‘त्या’ 153 घरांना मोठा दिलासा

पालिका मंडळाच्या बैठकीत ठराव

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा : म्हापसा पालिका मंडळाने कोनुनिदादच्या जागेतील 153 घरांना आयएल घरक्रमांक द्यावा असा ठराव केलाय. अधिकार्‍यांकडून या ठरावाची कार्यवाही न करता एखाद्याच्या तक्रारीच्या आधारे या घरांना पाठवलेली नोटीस मागे घेणं आणि सुनावणी रद्द करण्याचा ठराव पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

153 घरांना कोणत्या आधारे नोटीसा बजावण्यात आल्यात, असा सवाल पालिका मंडळाच्या बैठकीत उपस्थित करून नगरसेवकांनी नगराध्यक्षांना धारेवर धरेल. या लोकांना पाठविलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात तसंच सुनावणी रद्द करावी ही नगरसेवकांची मागणी मान्य करण्यात आली.

बैठकीत नगरसेवक फ्रेन्की कार्व्हालो यांनी हा प्रश्न उपस्थित केला. 153 घरांना वीज आणि नळ जोडणी आहे. पालिकेला महसूल प्राप्त व्हावा म्हणून या घरांना आयएल प्रमाणे घरक्रमांक देण्याचा ठराव घेण्यात आला आहे. तरीही या घरांना अभियंता विभागाकडून नोटीसी बजावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

फ्रेन्की कार्व्हालो म्हणतात, की…

या आरटीआय कार्यकर्त्यांचा पालिकेच्या कारभारात हस्तक्षेप वाढला आहे. सोपो कंत्राटदार, पालिका निरीक्षक तसेच विक्रेत्यांना धमकावलं जातंय. आरटीआयचा धाक दाखवून पालिका कर्मचार्‍यांना धमकाविले जाते. त्यांच्या आसनावर बसून पालिकेची कागदपत्रे चाळली जातात. हा प्रकार कर्मचारी तसेच नगरसेवकांनी निदर्शनास आणून देखील संबंधीतावर कोणताही कारवाई होत नाही. हा गंभीर प्रकार असून संबंधितांवर कडक कारवाई करावी.

पालिका मंडळाने या घरांना घर क्रमांक देण्याचा ठराव मंजूर केला आहे. पालिका मंडळ हे सर्वोच्च आहे. ठराव घेऊन ही प्रक्रिया सुरू असताना घरांची यादी तक्रारदार लोकांकडे कशी पोचली. अशा प्रकारे कागदपत्रं सहज उपलब्ध झाल्यास पालिकेच्या प्रत्येक प्रकियेत अडथळा निर्माण होईल, असं रोहन कवळेकर यांनी स्पष्ट केलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!