‘त्या’ पाच गाळ्यांचे तिथेच पुनर्वसन करा!

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी: बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालाय इस्पितळाच्या बाहेर असलेले गाडे उत्तर गोवा जिल्हाधिकारी कारवाई करून काढले होते. यातील सरकारी योजनेंतर्गत सुरु केलेल्या पाच गाडे चार आठवड्याच्या आत ठरल्या परिसरात स्थापित करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे. याबाबतचा निवाडा न्या. एस.जे. काठवाला आणि न्या. मिलिंद एन. जाधव या  द्विसदस्यीय विशेष खंडपीठाने १३ ऑगस्ट रोजी जारी केला.

 हेही वाचाः विद्यार्थ्याची फसवणूक केल्याप्रकरणी संशयिताला ५ दिवस पोलीस कोठडी

या प्रकरणी शिवदास नाईक, दिप्ती नाईक, बाबलो हळदणकर, लक्ष्मी सांब्राणी आणि प्रज्योती आमोणकर यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी राज्य सरकार, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, गोवा वैद्यकीय महाविद्याल व इतरांना प्रतिवादी केले. याचिकादाराना सरकारी योजनेंतर्गत गाडे देण्यात आले होते. त्यानुसार त्याचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांनी खंडपीठात याचिका दाखल  केली होती.

मुंबई उच्च न्यायालयाकडून आदेश

या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने वरील न्यायाधीशाचे विशेष खंडपीठाद्वारे सुनावणी घेतली असता, राज्य सरकारने याचिकादाराचे पुर्नवसन करण्याची हमी दिली. याची दखल घेऊन राज्य सरकारने स्वखर्चाने तसंच वीजेची जोडणी करून पाचही गाडे चार आठवड्याच्या आत देण्याचा आदेश जारी केला. तसेच याचिकादाराना ठरल्याजागी त्याची पुर्नवसन करण्याचा आदेश देऊन याचिका निकालात काढली आहे.  

हा व्हिडिओ पहाः MATRUCHAYA | फोंड्याच्या मातृछाया संस्थेची तयारी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!