पोगो बिलाविषयी रेजीनाल्ड यांनी विधानसभेत केलेले विधान खोटे : मनोज परब

पोगो बिल विधानसभेत मांडण्यासाठी दिले असल्यास पुरावा दाखवा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : आलेक्स रेजिनाल्ड यांनी पोगो बिल विधानसभेत मांडण्यासाठी दिले नव्हते, ते गोव्यातील जनतेच्या भावनांशी खेळ खेळत आहेत, असा आरोप रिव्होलूशनरी गोवंन्सचे आमदार विरेश बोरकर यांनी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्यावर केला.
हेही वाचा:३१ मद्यपी चालकांना खाकीचा दणका, परवाने जप्त…

जनतेची आपल्याला काळजी आहे अस दाखवण्याचा प्रयत्न

रिव्होलूशनरी गोवंन्स तर्फे पणजी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. “रेजिनाल्ड यांनी विधानसभेच्या सभागृहात गोव्यातील जनतेकडे खोटं बोलून विधानसभेतील पवित्र सभागृह अपवित्र केले आहे. ते प्रत्येक वेळी जनतेच्या भावनांशी खेळत असतात. यावेळीही त्यांनी आपण पोगो बिल मांडले असल्याचे खोटे विधान करून जनतेची उघड उघड फसवणूक केली. जनतेची आपल्याला काळजी आहे अस दाखवण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही जेव्हा चौकशी केली तेव्हा विधान भवनातून असा कोणताच पुरावा आपल्याला भेटला नसल्याची माहिती आर. जी. चे प्रमुख मनोज परब यांनी दिली.
हेही वाचा:मांडवी पुलावरुन उडी घेत एकाची आत्महत्या…

भ्रष्ट राजकारण्यांना जाग्यावर आणण्यासाठी आमदार विधानसभेत पोहोचला

पुढे बोलताना परब म्हणाले की, आमचा क्रांतिकारी आमदार आज विधानसभेत पोहोचला आहे, तो काही आमदारांची खोटी भाषणे ऐकण्यासाठी नाही तर जे मागील अनेक वर्षापासून अपवित्र झालेले स्थान पवित्र करण्यासाठी. त्या भ्रष्ट राजकारण्यांना जाग्यावर आणण्यासाठी. जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी. इतकी वर्षे एकाही आमदाराने गोवेकरांच्या हिताबद्दल विचार का केला नाही याचा जाब विचारण्यासाठी आमचा आमदार आज विधान भवनात पाठवला असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा:देव दामोदर भजनी सप्ताहाला प्रारंभ…

गोव्यातील जनतेची दिशाभूल करू नये

रेजीनाल्ड जर खरं बोलत आहेत तर त्यांनी पोगो बिल दिल्याचे व ते असंविधानिक असे उत्तर मिळ्याल्याचे सिद्ध करून दाखवावे. गोव्यातील जनतेची दिशाभूल करू नये. रेजीनाल्ड यांनी आदी आपल्या मतदारसंघातील बेकायदा झोपडपट्टी हटवाव्यात. आपल्या मतदारसंघात जे बेकायदेशीर, अनैतिक धंध्यावर कार्यवाही करावी, तरच गोवेकरांची पर्वा आहे हे सिद्ध होईल. उगीच विधानसभेत आरडाओरड करून काहीच उपयोग नाही. रेजिनाल्ड हे यापूर्वीही बीजेपी तसेच इतर पक्षाचे टीममध्ये असल्याचे सिद्ध झाले आहे. यापुढेही आम्ही रेव्होलूशनरी गोवंन्स असा खोटारडेपणा करणाऱ्या, जनतेची दिशाभूल करणाऱ्यांचा पर्दाफाश करू असेही मनोज परब म्हणाले.
हेही वाचा:स्टेशनरी दुकानाआड व्हायची गुटखा व सिगारेटची विक्री, मात्र…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!