सहकार भांडाराच्या निवडणूक स्थगितीस नकार

पुढील सुनावणी १५ एप्रिल रोजी होणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोवा सहकार भांडाराची २१ मार्च रोजी होणारी निवडणूक स्थगित ठेवण्यास नकार दिला आहे. या बाबतचा निर्देश बुधवारी जारी केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ एप्रिल रोजी होणार आहे.

हेही वाचाः पालिका आरक्षण – सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाच्या आव्हान याचिकेवर उद्या निकाल

खंडपीठाकडून निवडणूक स्थगित ठेवण्यास नकार

या प्रकरणी नारायण मांद्रेकर आणि संदेश मांद्रेकर या दोघांनी वेगवेगळ्या दोन याचिका खंडपीठात दाखल केल्या आहे. यात त्यांनी राज्य सरकार, सहकार निबंधक व इतरांना प्रतिवादी केले आहे. सहकार निबंधकाने २१ मार्च रोजी सहकार भांडाराची निवडणूक आयोजित केली आहे. या निवडणुकीत याचिकादाराने उमेदवारी अर्ज दाखल केले होते. संबंधित उमेदवारांचे नातेवाईक अशाच प्रकारचा व्यवसायात असल्याचा ठपका ठेवून निवडणूक अधिकाऱ्यांने त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळून लावला होता. या निवाड्याला खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेत निवडणूक प्रक्रिया स्थगित ठेवावी, तसंच अर्ज फेटाळण्याचा आदेश रद्दबातल करावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणी बुधवारी खंडपीठात सुनावणी झाली असता, खंडपीठाने निवडणूक स्थगित ठेवण्यास नकार दिला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!