पुढील काही तास महत्त्वाचे, पावसाचा रेड अलर्ट जारी

हवामान विभागाचा इशारा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यात सोमवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाचा जोर पुढचे काही तास वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. त्यामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलाय.

राज्यात धोधो पाऊस सुरू असून अनेक भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अशातच शुक्रवारपर्यंत राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र आता देण्यात आलेल्या सुधारित माहितीनुसार आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पावसाच्या जोरदार सारी बरसतील असा अंदाज वर्तवण्यात आल्या आहेत.

अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो. परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. अशावेळी प्रत्येकाला एक प्रश्न पडतोच. तो म्हणजो ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट म्हणजे काय? नैसर्गिक संकटाच्यावेळीच तो का जारी केला जातो? पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकतं, अशी सुचना जारी करण्यात येते तेव्हा यलो अलर्ट जारी करतात. दैनंदिन कामं रखडू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो. ऑरेंज अलर्टमध्ये रेड अलर्टपेक्षा थोडी कमी धोकादायक स्थिती असते, पण इथेही यंत्रणांनी सतर्क राहणं गरजेचं असतं. ऑरेंज अलर्टमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला असतो.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!