गोवा विमानतळावर ‘आयसीएमआर’ने मंजूर केलेल्या चाचण्यांना मान्यता

ट्वटि करून दिली माहिती; 72 तास आधीचा चाचणी अहवाल नसल्यास प्रवेश नाही

Goan Varta Live | प्रतिनिधी

दाबोळी: गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणातर्फे (एएआय)स्पष्टीकरण देण्यात आलं आहे की आता राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना ‘आरटी-पीसीआर, ट्रायनेट, सीबीएनएएटी, रॅपिड अँटीजेन’ चाचणी किंवा ‘आयसीएमआर’ने मंजूर केल्याप्रमाणे इतर कोणतीही चाचणी घेता येईल.

हेही वाचाः लाखेरेत बायो मेथानिसेशन प्रकल्पाची पायाभरणी

‘आयसीएमआर’ने मंजूर केलेल्या चाचण्यांना मान्यता

‘एएआय-गोवा’ विमानतळाने आपल्या पत्रकात म्हटलंय, कोविड ‘नकारात्मक प्रमाणपत्र’ म्हणजे ‘आरटी पीसीआर/ट्रूनाट/सीबीएनएटी, रॅपिड अँटीजेन’ टेस्ट किंवा ‘आयसीएमआर’ने मंजूर केलेली कोणतीही इतर चाचणी मान्य केली जाईल.

हेही वाचाः …तर बेळगावात लॉकडाऊन का?

ट्वटि करून दिली माहिती

गोवा राज्यात प्रवेश करण्यासाठी नकारात्मक ‘आरटी-पीसीआर’ चाचणी अहवाल असणं आवश्यक असल्याचं विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं आहे, असं विमानतळाने आपल्या ‘ट्विट’मध्ये म्हटलंय.

हेही वाचाः ‘या’ व्यक्तींच्या लसीकरणाला प्राधान्य; अधिकृत परिपत्रक जारी

72 तास आधीचा चाचणी अहवाल नसल्यास प्रवेश नाही

राज्य प्रशासन हे सुनिश्चित करेल की ज्या व्यक्तीकडे गोव्याच्या प्रवेशासाठी जास्तीत जास्त 72 तास आधी चाचणीवर आधारित कोविड नकारात्मकता प्रमाणपत्र नाही, अशा कोणालाही गोव्यात जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं आदेशात नमूद केले आहे.

हेही वाचाः गुजरात साहित्य परिषदेनं ‘त्या’ कवयित्रीला ठरवलं ‘नक्षली’

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकारने गोवा राज्यात प्रवेश करण्यापूर्वी कोविड नकारात्मक प्रमाणपत्र तपासणीचे आदेश दिलेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!