…म्हणून मुख्यमंत्री अचानक दिल्लीला गेले होते!

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
ब्युरो : मुख्यमंत्री अचानक गुरुवारी दिल्लीला रवाना झाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. अखेर मुख्यमंत्र्यांनीच आपण दिल्लीला का गेलो होतो, याची माहिती दिली आहे. अमित शहांसोबतचा फोटो फेसबूकवर टाकून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे राजकीय चर्चांना पूर्णविराम लागलंय.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. शहा यांनी खाण प्रश्न आणि सर्व विकासात्मक प्रकल्पांची माहिती घेतली. शहा यांना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा पंचायत आणि येत्या पालिका निवडणुकीचीही माहिती दिली. गोव्यातील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपण संपूर्ण सहकार्य देऊ, असे आश्वासन शहा यांनी दिले, असे डॉ. सावंत यांनी सांगितलंय.
हेही वाचा – ‘आयआयटी होणारच! कुणालाही कायदा हातात घेता येणार नाही’
प्रस्तावित आयआयटीच्या आरेखनाच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यात चांगलाच गाजतोय. दरम्यान, त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री दिल्लीला गेलेत की काय, असा तर्क लावला जात होता. याबाबतही अमित शहांसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली असल्याचं बोललं जातंय. मात्र त्यासोबत खाणप्रश्नीही मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिल्लीवारीत महत्त्वाची चर्चा केली असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्मयंत्र्यांची दिल्लीवारी महत्त्वाची मानली जातेय.
Called on Hon'ble Union Home Minister Shri Amit Shah ji today in New Delhi. Discussed about mining and other matters…
Posted by Dr. Pramod Sawant on Thursday, 7 January 2021