किनारी क्षेत्र आराखड्यासाठी फेर जनसुनावणी गुरुवारपासून

पणजीच्या कांपालवर तर एसजीपीडीएच्या मैदावार जनसुनावणी; व्हर्च्यूअल पद्धतीनेही घेता येईल सहभाग

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

पणजीः ‘जीसीझेडएमपी’ अर्थात गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यासाठी आता 8 जुलै म्हणजेच उद्यापासून नव्याने जनसुनावणी होणार आहे. उत्तरेत कांपाल परेड मैदान, तर दक्षिणेत एसजीपीडीएच्या मैदानावर ही जनसुनावणी होईल. प्रत्यक्षात भाग घेण्याबरोबरच व्हर्च्यूअल आणि ऑनलाईन पद्धतीनेही यात सहभागी होता येईल. 30 जूनपर्यंत यासंबंधीची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करावयाची आहे.

हेही वाचाः एंटरटेन्मेंट सिटी प्रकल्प पर्यावरण, गोंय, गोंयकारपण संभाळून होईल

7 मार्च 2021 रोजीची जनसुनावणी ठरवली होती रद्दबातल

राष्ट्रीय हरित लवादाकडून दणका मिळाल्यानंतर सरकारने अखेर ‘जीसीझेडएमपी’ प्रक्रिया सुरू केलीए. 7 मार्च 2021 रोजीची जनसुनावणी रद्दबातल ठरविल्यामुळेच सरकारवर फेर जनसुनावणीची वेळ ओढवलीए. किनारी भागांच्या शाश्वत विकासासाठी प्रत्येक राज्याला किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा तयार करणं बंधन आहे. या आराखड्यानुसारच भविष्यात किनारी क्षेत्रात विविध प्रकल्पांना मान्यता दिली जाऊ शकते. या सुनावणीवेळी २५४ आराखड्यांवर हरकती एकून घेतल्या जाणार आहेत. तर आतापर्यंत तब्बल ५ हजारपेक्षा जास्त लेखी हरकती सादर झाल्या आहेत. दरम्यान, या सुनावणीचं चित्रण करुन ठेवण्याचा आदेशही लवादाने दिला आहे. रात्री आणि पहाटेपर्यंत सुनावणी सलग २४ तास चालली तरी चालेल, पण हरकत मांडण्यास आलेली अखेरची व्यक्ती आपली बाजू मांडून जोपर्यंत संपवत नाही, तोपर्यंत ही सुनावणी चालूच राहणार आहेत. दरम्यान, सुनावणी न थांबता दिवस रात्र सलग चालू ठेवण्याचा आदेशही हरीत लवादाने दिलाय. यासाठी पणजीच्या कांपाल मैदानावर तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे.

हेही वाचाः मांद्रे गट काँग्रेसकडून समाजसेवेतून सामाजिक बांधिलकी जपण्याचे प्रयत्न

मडगावात मार्केट दोन दिवस बंद ठेवण्यास व्यापाऱ्यांचा विरोध

दुसरीकडे मडगावात सीझेडएमपीची जनसुनावणी एसजीपीडीएच्या भाजी मार्केटनजीक आयोजित करण्यात आलेली आहे. कांपालप्रमाणेच एसजीपीडीएच्या मैदानावर जनसुनावणी होणार असल्याने मंडप उभारणीचं काम सुरू आहे. या सुनावणीसाठी मार्केट दोन दिवस बंद ठेवण्यास मार्केटमधील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवलाय. बुधवारी सकाळी मार्केटमध्ये येण्याच्या वाटांवर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. तसंच मार्केट बंद ठेवण्यात येणार असल्याबाबत एसजीपीडीएकडून कोणतीही पूर्व कल्पना देण्यात आलेली नव्हती. या पार्श्वभूमीवर मार्केटमधील व्यापाऱ्यांनी दोन दिवस मार्केट बंद ठेवण्याच्या निर्णयाला विरोध दर्शविला. तसंच मार्केटमधील येण्याच्या वाटांवरील बॅरिकेड्स हटवले. मार्केट बंद ठेवण्याबाबत एसजीपीडीएकडून कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. त्यामुळे मागवलेला माल खराब होऊ शकतो तसंच दोन दिवस मार्केट बंद ठेवल्यास आर्थिक नुकसान सहन करावं लागेल. त्यामुळे राज्य सरकारने जनसुनावणी दुसऱ्या जागेवर घ्यावी किंवा व्यापाऱ्यांच्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!