सर्किट हाऊस सुविधा निविदा पुन्हा जारी करा!

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचा आदेश

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी: आल्तिनो येथील सर्किट हाऊसमध्ये सुविधा पुरविण्यासाठी कायद्यानुसार पुन्हा निविदा जारी करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जारी करून ती याचिका निकालात काढली.      

हेही वाचाः लार्वे बीच क्लबला २३ पूर्वी बाजू मांडण्याचा आदेश

सोहन झुवारकर यांनी खंडपीठात याचिका दाखल केली

या प्रकरणी सोहन झुवारकर यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेत राज्य सरकार, सार्वजनिक खात्यासह इतर सरकारी खाते व  सोहम ट्रान्सपोर्ट आणि अर्थमुव्हर्स यांना प्रतिवादी केले आहे.      

तिघांनी निविदा दाखल केली

आल्तिनो येथील सर्किट हाऊसमध्ये हाऊसकीपिंग, कॅटरिंग आणि देखभाल व्यवस्था पुरुविण्यासाठी तिघांनी निविदा दाखल केली होती. त्या कामाची अंदाजे किंमत ९ कोटी ८८ लाख १९ हजार ४४२ रुपये होती. असे असताना इतर दोन कंपन्यांनी या किमतीपेक्षा २० टक्के कमी दर दिला होता. तर याचिकादाराची दर ३० टक्के कमी होता. असे असताना याचिकादाराची निविदा फेटाळून लावली तसेच सोहम ट्रान्सपोर्ट आणि अर्थमुव्हर्स कंपनीने सादर केलेली निविदा ग्राह्य धरली. त्यामुळे याचिकादाराने खंडपीठात याचिका दाखल करून वरील मुद्दा मांडला. दरम्यान, याबाबत सर्व त्रुटी दूर करून ती निविदा रद्द करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. तसेच पुन्हा निविदा जारी करण्यात येणार असल्याची माहिती एजी देवीदास पांगम यांनी खंडपीठात दिली.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | WORLD PHOTOGRAPHY DAY SPECIAL | ज्येष्ठ प्रेस फोटोग्राफर सुनील नाईक यांच्याशी संवाद !

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!