सिध्दी नाईक प्रकरणाची नव्याने चौकशी करा

नास्नोळा पंचायत मंडळाची ठरावाद्वारे मागणी

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा: नास्नोळा पंचायत मंडळाने सिद्धी नाईक हिच्या मृत्यूची नव्याने सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. पंचायत मंडळाने ठराव घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे ही मागणी केली आहे.

हेही वाचाः CORONA UPDATE | चिंता वाढली! कोविड मृतांचा आकडा वाढला

सोमवारी झाली बैठक

सोमवारी सकाळी सरपंच तृप्ती बांदोडकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत मंडळाची पंधरावडा बैठक झाली. यावेळी उपसरपंच फ्रेडी फर्नांडीस, पंच रिना गोवेकर, गोविंद गोवेकर आणि सतीश गोवेकर उपस्थित होते.

सिद्धी नाईक प्रकरणाची पुर्नचौकशी करण्याचा ठराव

या बैठकीत पंच सदस्य सतीश गोवेकर यांनी सिद्धी नाईक प्रकरणाची पुर्नचौकशी करण्याचा ठराव प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव पंचायत मंडळाने सर्वानुमते मान्य केला. ज्या अवस्थेत सिद्धी नाईक हिचा मृतदेह सापडला त्यानुसार हे आत्महत्या प्रकरण विश्वास ठेवण्यालायक नाही, असं या ठरावात नमुद करण्यात आलं आहे.

हेही वाचाः जातीभेद न मानणाऱ्या मगो पक्षाला साथ द्या

सिद्धी नाईक हिला तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा. यासाठी तिच्या मृत्यू प्रकरणाची नव्याने चौकशी करावी, अशी मागणी आम्ही ठरावाच्या माध्यमातून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे केली आहे, अशी माहिती सरपंच तृप्ती बांदोडकर यांनी दिली.

हा व्हिडिओ पहाः Shocking Accident | CCTV | ….म्हणून रस्ता ओलांडताना नेहमी सतर्क राहावं

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!