श्रीलंकेतला दुर्मिळ ‘तस्कर’ सावंतवाडीत !

सर्पमित्र तुषार विचारे यांनी दिलं जीवदान !

विनायक गांवस | प्रतिनिधी

सावंतवाडी : तस्कर हा भारतीय उपखंडात आढळणारा अतिशय निरुपद्रवी बिनविषारी साप आहे. इंग्रजीत याला ट्रिंकेट अथवा साधा असं म्हणतात. हा दुर्मिळ असणारा साप आज सावंतवाडीत आढळून आला. माठेवाडा इथं राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या निवासस्थानी हा साप आढळला.

अतिशय शांत स्वभावाचा हा साप हाताळायला अतिशय सोपा आहे. तस्कर या शब्दाचा मराठीत अर्थ तस्करी अथवा चोरी करणारा असा होतो. हा साप लांबीला साधारणपणे १/२ ते १ मीटरपर्यंत असतो तर जाडीला १ इंचापर्यंत असतो. त्याचा अंगावर पट्टे असतात, हे पट्टे सुरेख बुद्धीबळातील पटासारख्या छोट्या काळ्या पांढर्‍या चौकोनांनी भरलेले असतात. हा साप मुख्यतः श्रीलंका आणि पश्चिम भारतात आढळतो हा साप महाराष्ट्रात क्वचित आढळतो.

हा दुर्मिळ असणारा साप आज सावंतवाडीत आढळून आला. माठेवाडा इथं राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या निवासस्थानी हा साप आढळला. यावेळी सर्पमित्र तुषार विचारे यांना याची कल्पना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र तुषार विचारे यांनी त्या तस्कर सापाला पकडलं. माठेवाडा इथं आलेला हा साप बाजूला असणाऱ्या नरेंद्र डोंगर भागातून हा दुर्मिळ साप आल्याची शक्यता आहे. सर्पमित्र तुषार विचारे यांनी या आधी अनेक प्रकारचे साप पकडले असून त्यांचा या कार्याची दखल घेत विविध संस्थांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!