म्हापशात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

संशयितास अटक; पीडिता दीड महिन्यांची गरोदर; मैत्रीचा गैरफायदा घेऊन केला लैंगिक अत्याचार

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा: बार्देस तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी प्रज्योत गावकर (२३, शिरगाव डिचोली) यास अटक केली आहे. पीडित ही दीड महिन्यांची गरोदर असून हॉस्पिटलात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

हेही वाचाः बुधवारी कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढला आणि मृत्यूसंख्याही!

मैत्रीचा गैरफायदा घेतला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताची पीडितेसोबत मैत्री झाली. या मैत्रीचा गैरफायदा घेत संशयिताने तिचा लैंगिक अत्याचार केला. पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने तिला पालकांनी हॉस्पिटलात नेलं असता मुलगी दीड महिन्यांची गरोदर असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं. लैंगिक अत्याचाराचा हा प्रकार एप्रिल २०२१ मध्ये घडला होता.

हेही वाचाः निकृष्ट कामामुळं मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसूली नको !

संशयितास अटक

पीडितेच्या आईच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयिताविरुद्ध भादंसंच्या कलम ३७६ (२)(१), तसंच गोवा बाल कायदा कलम ८ आणि पोस्को कायदा कलम ४,८,१२ नुसार गुन्हा दाखल केला.
पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अल्विटो डिमेलो, शिपाई प्रकाश पोळेकर आणि राजेश कांदोळकर यांनी संशयितास पकडलं. त्यानंतर वरील गुन्ह्याखाली त्यास अटक करण्यात आली. पुढील तपास उपनिरीक्षक रिचा भोसले करीत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!