मुंबईकरांना सुनावलं! ‘मुंबई एअरपोर्टवर फक्त 40 टक्के लोकं मास्क घालतात’

आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंचा टोला

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईकरांना टोला हाणलाय. मुंबईत गेलो असता तिथे फक्त 40 टक्केच लोकं मास्क घालतात आणि त्यातही 20 टक्के लोक नाकाखाली मास्क घालत असल्याचा टोला त्यांनी लगावलाय. मुंबई विमानतळावर पाहिलेल्या दृश्याचा हवाला देत, त्यांनी मुंबईकरांवर निशाणा साधलाय.

60 टक्के लोक मास्कच घालत नाही

60 लोकं मास्कच घालत नसल्यानं आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग फोफावण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे दररोज 12 हजार लोकं गोव्यात दाखल होत आहेत. विमानानं दाखल होणाऱ्या पर्यटकांची ही संख्या लक्षणीय आहे. राज्यातील पर्यटनाची खबरदारी घेतानाच कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याचीही दक्षता घ्यायला हवी, असं आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हटलंय. पणजीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाराष्ट्राप्रमाणे कडक एसओपींची गरज

महाराष्ट्राने कडक एसओपी लागू केल्या आहेत. गोव्यातून विमानानं किंवा रेल्वेनं येणाऱ्यांना आरटीपीसीआर टेस्ट करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातही एसओपींचं कडक पालनं होणं गरजेचं असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय. नाईट कर्फ्यूबाबतही त्यांनी महत्त्वाचं विधान केलंय. राज्यात कोणत्याही क्षणी नव्या आणि कठोर एसओपी जारी करता येतील, मात्र सर्व नागरीकांनी आत्मपरीक्षण करुन जबाबदारीनं वागण्याची गरज यावेळी आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!