संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आज गोव्यात

संरक्षण राज्यमंत्र्यांच्या प्रकृतीची करणार चौकशी

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : संरक्षण राज्यमंत्री तथा केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh) आज जीएमसीला भेट देणार आहेत.

अंकोला-कारवार इथल्या अपघातात श्रीपाद नाईक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बांबोळीच्या गोमेकॉत उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दिली.

दरम्यान, गोवा दौर्‍यावर असलेले उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू (M. Venkaiah Naidu) यांनी गोमेकॉला भेट देउन श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

श्रीपाद नाईक यांच्यावर गोमेकॉच्या आयसीयूत उपचार सुरू आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!