महिला संगीत नाट्यस्पर्धेत ‘स्वर सत्तरी, होंडा’चा डंका

'संगीत मत्स्यगंधा' नाटक प्रथम, 'संगीत शारदा' द्वितीय

शेखर नाईक | प्रतिनिधी

फोंडा : फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिर आयोजित स्व. किशोरीताई हळदणकर स्मृती सहाव्या राज्यस्तरीय महिला संगीत नाट्यस्पर्धेत ‘स्वर सत्तरी, होंडा’ संस्थेने सादर केलेल्या ‘संगीत मत्स्यगंधा’ नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला.

द्वितीय क्रमांक श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळ, केरी-फोंडा यांनी सादर केलेल्या ‘संगीत शारदा’ नाटकास, तर अभिनव कला थिएटर मांद्रे-पेडणे यांनी सादर केलेल्या ‘संगीत ययाती आणि देवयानी’ नाटकास तृतीय क्रमांक प्राप्त झाला.

श्री देवी माऊली कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ, मेणकुरे-डिचोली यांच्या संगीत गुरुदक्षिणा, श्री गुरुकृपा संगीत सांस्कृतीक संस्था, म्हार्दोळ यांच्या संगीत सौभद्र आणि सांताक्रूझ येथील निशद पणजी यांनी सादर केलेल्या संगीत संशयकल्लोळ नाटकास अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय उत्तेजनार्थ बक्षिसे प्राप्त झाली.

दिग्दर्शनाचे प्रथम बक्षीस शिवनाथ नाईक यांना

वैयक्तिक बक्षिसात दिग्दर्शनाचे प्रथम बक्षीस संगीत मत्स्यगंधा नाटकासाठी शिवनाथ नाईक यांना, द्वितीय बक्षीस संगीत शारदा नाटकासाठी कामलाक्ष खेडेकर यांना तर संगीत ययाती आणि देवयानी नाटकासाठी प्रशांत मांद्रेकर यांना प्राप्त झाले.

पुरुष भूमिकेसाठी कृतिका जाण यांना प्रथम बक्षीस

पुरुष भूमिकेसाठी कृतिका जाण (भुजंगराव, सं. शारदा ), मृण्मयी मांद्रेकर (ययाती, सं. ययाती आणि देवयानी) आणि डॉ. वेदिका वाळके (फाल्गुनराव, सं. संशयकल्लोळ) यांना, तर स्त्री भूमिकेसाठी संपदा गोपाळ गावस (अंबा, सं. मत्स्यगंधा) धनश्री बाबूसो नाईक (सीता, सं. अयोध्येचा ध्वजदंड) आणि प्राजक्ता लोटलीकर (कृतिका, सं. संशयकल्लोळ) यांना प्रथम तीन क्रमांक प्राप्त झाले.

नेपथ्याचे प्रथम बक्षीस नितीन नाईक यांना

उत्कृष्ट नेपथ्याचे प्रथम बक्षीस गुरुदक्षिणा नाटकासाठी नितीन नाईक यांना, तर प्रमोद मांद्रेकर यांना ययाती आणि देवयानी नाटकासाठी द्वितीय बक्षीस मिळाले. प्रकाश योजनेचे प्रथम बक्षीस सं. मत्स्यगंधा नाटकासाठी उदय धुपकर यांना, तर द्वितीय बक्षीस सं. गुरुदक्षिणा नाटकासाठी नितेश नाईक यांना प्राप्त झाले.

ध्वनीसंकलनाचे प्रथम बक्षीस दीपक गावस सं. मत्स्यगंधा, तर सं. गुरुदक्षिणा नाटकासाठी नीलेश नाईक यांना प्राप्त झाले. वेशभूषेचे प्रथम बक्षीस सं. शारदा नाटकासाठी प्रेरणा देसाई यांना, तर द्वितीय बक्षीस सं. ययाती आणि देवयानी नाटकासाठी दत्ताराम सोपटे यांना प्राप्त झाले. रंगभूषेचे प्रथम बक्षीस सं. सौभद्र नाटकासाठी जितेंद्र परब यांना, तर द्वितीय बक्षीस सं. गुरुदक्षिणा नाटकासाठी निळकंठ खलप यांना प्राप्त झाले.

ऑर्गन वादनाचे प्रथम बक्षीस महेश गावस यांना

उत्कृष्ट संवादिनी/ऑर्गन वादनाचे प्रथम बक्षीस महेश गावस (सं. मत्स्यगंधा) यांना, तर प्रदीप शिलकर (सं. शारदा) यांना द्वितीय बक्षीस प्राप्त झाले. तबला वादनाचे प्रथम बक्षीस सं. मत्स्यगंधा साठी शैलेश शिरोडकर यांना, तर सं. शारदा नाटकासाठी मिलिंद परब यांना प्राप्त झाले.

पुरुष भूमिकेतील उत्कृष्ट गायनासाठी लता गावस यांना प्रथम बक्षीस

पुरुष भूमिकेतील उत्कृष्ट गायनासाठी लता गावस सं. मत्स्यगंधा यांना प्रथम, तर सं. ययाती आणि देवयानीतील कच भूमिकेतील भक्ती धुपकर यांना द्वितीय बक्षीस प्राप्त झाले. स्त्री भूमिकेतील गायनासाठी ययाती आणि देवयानीतील शर्मिष्ठा भूमिकेतील सिद्धी पार्सेकर यांना प्रथम, तर सं. सौभद्र नाटकातील सुभद्रेच्या भूमिकेतील चिन्मयी कामत यांना द्वितीय बक्षीस प्राप्त झाले.

बाल कलाकारांमध्ये साईली नाईक प्रथम

बाल कलाकारांमध्ये सं. गुरुदक्षिणा नाटकातील कृष्णाची भूमिका केलेल्या साईली नाईक हिला प्रथम, तर सं. शारदा नाटकातील मंदाकिनीची भूमिका केलेल्या अनुष्का जाण हिला द्वितीय बक्षीस प्राप्त झाले.

स्पर्धेचे परीक्षण मंगला जांभळे, प्रचला आमोणकर आणि निवेदिता चंद्रोजी यांनी केले. लवकरच कला मंदिरामध्ये होणाऱ्या सोहळ्यात विजेत्यांना बक्षिसे दिली जातील, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!