राजीव गांधीनी घटकराज्य दिलं, भाजपने गोव्याचा संघप्रदेश केलाय

विरोधी पक्ष नेते दिगंबर कामतांची टीका; माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना वाहिली आदरांजली

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगावः भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी गोव्याला घटकराज्याचा दर्जा दिला. स्थानिक स्वराज्य संस्थाना मजबुत करण्याचं काम राजीव गांधीनी केलं. परंतु, भाजप सरकारने आज राज्याची स्थिती संघप्रदेशासारखी करून टाकली आहे, असं विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटलं आहे. माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित आदरांजली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, महिला काँग्रेस अध्यक्ष बिना नाईक, दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ज्यो डायस, प्रदेश काँग्रेसचे सुभाष फळदेसाई, दामोदर शिरोडकर तसंच जिल्हा काँग्रेसचे पिटर गोम्स, ॲड. येमन डिसोजा, आर्क. रॉयला फर्नांडिस व इतर हजर होते.

हेही वाचाः तरुण तेजपाल प्रकरणातील निकाल दुर्दैवी

भाजप सरकारला गोंयकारांचं काहीच पडलेलं नाही

परवा भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरात आणि दिवची हवाई पाहणी केली. काल पंतप्रधानानी घेतलेल्या विवीध राज्यांच्या डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेटच्या बैठकीत गोव्याला स्थान देण्यात आलं नाही. यावरुन भाजप सरकारला गोवा आणि गोंयकारांच्या यातनांचं काहीच पडलेलं नाही हे स्पष्ट होतं, असं कामत म्हणाले.

पंतप्रधानांना गोव्याची आठवण झाली नाही हे धक्कादायक

आज संपूर्ण देशात कोविड संसर्गाची सर्वाधिक लागण झालेल्यात गोवा अगदी वरच्या स्थानावर आहे. ऑक्सिजन अभावी गोव्यात ७४ जणांचे प्राण गेले. आज कोविड लसीकरण आणि चाचणी यात गोवा अगदी शेवटच्या स्थानावर आहे. या परिस्थितीत गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे बोलणं हे पंतप्रधानांचं कर्तव्य होतं. परंतु, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांबरोबर पुद्दुचेरी राज्याला सुद्धा सदर बैठकीत सहभागी करुन घेताना पंतप्रधानांना गोव्याची आठवण झाली नाही हे धक्कादायक आहे, असं कामत म्हणाले.

हेही वाचाः कठीण काळात मला साथ दिलेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार

भाजप सरकारने गोव्याचा विश्वासघात केला

सन २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून भाजपने गोव्याला सापत्नभावाची वागणुक दिली आहे. म्हादई पाणी वाटपात भाजप सरकारने गोव्याचा विश्वासघात केला. भाजपनेच बंद पाडलेला खाण व्यवसाय सुरू करण्यास केंद्रातील भाजप सरकार काहीच करीत नाही. गोव्याची अस्मिता नष्ट करुन इथे कोळसा हब करण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करीत आहे. पर्यावरण नष्ट करून मोले येथे तीन प्रकल्पांचं काम पुढे रेटण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे, ज्याचा फायदा केवळ क्रोनी क्लबला होणार आहे. भाजप सरकारने गोमंतकीयांना किनारी व्यवस्थापन आराखडा सुनावणीतही भाग घेण्यास दिल नाही. यावरुन भाजपची गोव्याच्या विरूद्धची भूमीका स्पष्ट होते.

हेही वाचाः तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता

गोमंतकीय नेहमीच त्यांचे ऋणी राहतील

केंद्रातील काँग्रेस सरकाराचं गोव्यासाठी खास योदगान होतं. स्व. राजीव गांधी यांनी गोव्याला घटकराज्याचा दर्जा दिला. कोंकणीला राजभाषेचा दर्जा व घटनेच्या आठव्या परिशिष्टात स्थान राजीव गांधीमुळेच मिळालं हे सत्य आहे. गोव्यावर केलेल्या उपकारांसाठी गोमंतकीय नेहमीच त्यांचे ऋणी राहतील, असं कामत म्हणाले.

हेही वाचाः काळापेक्षाही क्रूर बनला कोरोना ; एकाच दिवशी कुटुंबातल्या तिघांचा बळी !

यामुळेच गोंयकारांच्या वाट्याला त्रास

आज राज्यातील भाजप सरकारला केंद्रातील भाजपचंच सरकार किंमत देत नाही. राज्य सरकारचा रिमोट आज दिल्लीतील नेत्यांच्या हातात आहे. यामुळेच गोंयकारांना त्रास आणि कष्ट सहन करावे लागत आहेत, असा टोला कामतांनी हाणला.

हेही वाचाः दाबोळीत नौदलाकडून लसीकरण केंद्राची स्थापना

माजी पंतप्रधान राजीव गांधींची उणीव भासतेय

स्व. राजीव गांधी यांनी संघीय प्रणालीचा वापर करुन स्थानिक स्वराज्य संस्थानी अधिकार दिले. नगरपालिका आणि पंचायतींना मजबुत बनविण्याचं काम स्व. राजीव गांधींनी केलं. आजचा दिवस काँग्रेस पक्ष माणुसकीला सेवा देऊन पाळणार आहे. आज भाजप सरकार देशात कोविड लसीकरण करण्यासाठी चाचपडत असताना देशवासीयांना कर्तबगार असलेल्या माजी पंतप्रधान राजीव गांधींची उणीव भासतेय. राजीव गांधींनी जी स्वप्नं पाहिली, ती प्रत्यक्षात उतरवून दाखविली, असे काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यावेळी बोलताना म्हटलं.

big_168769_CONGRESS-PC-BY-GIRISH-CHODANKAR-ON-24-OCTOBER-2019-SAGUN-GAWADE-2-1-2

महिला काँग्रेस अध्यक्ष बिना नाईक यांनी महिला काँग्रेसने हाती घेतलेल्या विवीध उपक्रमांची माहिती दिली. दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ज्यो डायस यांनी संपूर्ण दक्षिण गोव्यात विवीध गट काँग्रेसतर्फे सेवा उपक्रम राबविण्यात आल्याचं सांगितलं. कोविड आणि चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना मदत करण्यासाठी काँग्रेस सदस्य आज कार्यरत असल्याचं ते म्हणाले. सुरुवातीला उपस्थित सर्व काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि सदस्य तसंच कार्यकर्त्यांनी स्व. राजीव गांधींच्या तसबिरीला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!