राजेंद्र आर्लेकर 13 जुलै रोजी घेणार हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदाची शपथ

शिमला येथील राजभवनात सकाळी १० वाजता होणार सोहळा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः हिमाचल प्रदेशचे नवनिर्वाचित राज्यपाल म्हणून राजेंद्र आर्लेकर 13 जुलै रोजी शपथ घेणार आहेत. सकाळी 10 वाजता शिमला येथील राजभवनातील दरबार सभागृहातील कीर्ती कक्षात हा सोहळा संपन्न होणार आहे.

हेही वाचाः दोनपेक्षा अधिक मुले असल्यास कुटुंब गमावणार हे सरकारी लाभ

हिमाचल उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आर्लेकरांना देणार शपथ

शिमलातील राज भवनची इमारत ही १८३२ मध्ये बांधलेली वारसा इमारत आहे. हिमाचल उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आर्लेकरांना शपथ देणार आहेत. मुख्यमंत्री, मंत्री सहकारी, घटनात्मक संस्थांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी मान्यवर या समारंभाला उपस्थिती लावणार आहेत.

हेही वाचाः मोठी बातमी | भारत-श्रीलंका सामन्यांच्या वेळापत्रकात बदल

राज्यपालपदी नियुक्त झालेले आर्लेकर तिसरे गोमंतकीय सुपुत्र

राज्यपालपदी नियुक्त झालेले राजेंद्र आर्लेकर हे तिसरे गोमंतकीय सुपुत्र ठरलेत. यापूर्वी अँथनी लान्सलोट डायस तसंच जनरल सुनीथ फ्रान्सिस रॉड्रिगीस यांची नियुक्ती राज्यपाल पदावर त्यांच्या प्रशासकीय आणि लष्करी सेवेच्या बळावर झाली होती. मात्र राजकीय पार्श्वभूमी असलेले राजेंद्र आर्लेकर हे पहिले गोव्याचे राज्यपाल ठरलेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यानंतर जनसंघ आणि भाजप असा त्यांचा प्रवास राहीलाय. गोव्यात भाजपचं कमळ रूजवण्यात राजेंद्र आर्लेकरांचंच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबांच मोठ योगदान आहे. आणीबाणीच्या काळात ते स्वतः आपल्या वडिलांसोबत तुरूंगात होते. अगदी सामान्य लोकांच्या ओळखीची व्यक्ती राज्यपालपदावर पोहचणं ही खरोखरच भाग्याची गोष्टच ठरलीए.

हेही वाचाः म्हापसा पालिकेची जुनी मामलेदार इमारत जमिनदोस्त करण्याचं काम सुरू

2002 साली वास्को मतदारसंघातून राजेंद्र आर्लेकर हे पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. अगदी रस्त्यावर कमळ रंगवणारे कार्यकर्ते ते पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद भूषविण्याचा मान प्राप्त झालेले हाडाचे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. अनुसुचित जातींचे हक्क आणि अधिकार याबाबत काँग्रेसकडून खूप काही बोललं जातं. पण भाजपने आर्लेकरांची राज्यपालपदी नियुक्ती करून बोलणं आणि वागणं यात खूप फरक असतो हे दाखवून दिलंय. बी- काँम पदवी प्राप्त झालेले आर्लेकर कुटुंब हे वास्कोत स्थायिक झालंय. त्यांचं मूळ गाव मये आहे. सभापती म्हणून काम करताना त्यांनी पहिल्यांदाच गोवा विधानसभेत कोकणी भाषेला सन्मान प्राप्त करून दिला. विधानसभेचं कामकाज कोकणीतून चालू शकतं हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. दुर्दैवाने त्यांच्यानंतर ही परंपरा पुढे जाऊ शकली नाही. पेपरलेस विधानसभा कामकाजाचा मान त्यांनीच प्राप्त करून दिला. प्रखर राष्ट्रवाद, संघाचे पक्के विचार आणि भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे यांच्यावर जबरदस्त पकड आणि निष्ठा असूनही सर्वंच विचारप्रणालींच्या लोकांसोबत सौहार्दाचे संबंध ठेवण्याची किमया ही फक्त आर्लेकरांनीच साधली.

हेही वाचाः CORONA UPDATE | राज्यातील नव्या कोविडबाधितांची संख्या घटली; मृतांचा आकडा वाढला

राजेंद्र आर्लेकरांनी या अगोदर गोव्याचे सभापती म्हणून या निष्पक्ष पदी काम केलंय. त्यानंतर काही काळासाठी ते गोवा सरकारात मंत्री म्हणूनही कार्यरत होते. आता पुन्हा एकदा निष्पक्ष भूमिका आवश्यक असलेल्या राज्यपाल पदावर त्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!