राज्यासह या भागात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज

राज्याच्या अनेक भागांमध्ये ऐन थंडीत पावसाच्या सरी बरसु लागल्यात.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्याच्या अनेक भागांमध्ये ऐन थंडीत पावसाच्या सरी बरसु लागल्यात. ऐन थंडीत येऊन धडकलेल्या या अवकाळी पावसामुळे हिवसाळा अनुभवायला मिळतोय. गेल्या काही दिवसांत गोव्यासह कोकणात पावसाचं आगमन झालंय. या अचानक आलेल्या पावसामुळे सगळेच गोंधळेत. गोव्याच्या उत्तर तसंच दक्षिण भागात गेल्या २४ तासांत हलक्या सरींची नोंद झालीये. त्यामुळं रस्ते ओलेचिंब झालेत आणि वातावरणात गारवा निर्माण झालाय. गोव्याच्या राजधानीतही असंच काहीसं चित्र आहे.


दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं गोवा, कारवार, कोकण, मुंबईत पावसाळी वातावरण आहे. पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवली जातेय. येत्या तीन दिवसांत गोव्यासह कोकण, महाराष्ट्र, कारवारात हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गोव्यात ९ जानेवारीपर्यंत पावसाळी स्थिती राहणार असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होणारेय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.