साखळी मतदार संघातील पायलटना मुख्यमंत्र्यांकडून रेनकोट

महामारीतही प्रामाणिकपणे सेवा बजावणारे पायलट खरेच अभिनंदनास पात्र - मुख्यमंत्री

विशांत वझे | प्रतिनिधी

डिचोली : साखळीचे आमदार तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मतदारसंघातील मोटरसायकल पायलटना रेनकोटचे वितरण केले. साखळी भाजप कार्यालयात झालेल्या या रेनकोट वितरण कार्यक्रमास साखळीचे माजी नगराध्यक्ष यशवंत माडकर, दयानंद बोर्येकर, आनंद काणेकर, सुभाष फोडेकर आदी उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, मतदारसंघात शहर तसेच ग्रामीण भागात कोरोना महामारी काळातही प्रामाणिकपणे सेवा बजावणारे पायलट खरेच अभिनंदनास पात्र ठरतात. त्यांना ठराविक अशी मिळकत नसली तरी स्वतः कष्ट करून ते आपला संसाराचा गाडा चालवतात. त्यांना अल्प असे सहकार्य करण्याची संधी मला लाभली हे मी माझं भाग्य समजतो.

पायलाटांना आर्थिक मदत देण्याची घोषणा क्रांतिदिनी करण्यात आली आहे. साखळी नगरपालिका, पाळी, वेळगे, सुर्ला, कुडणे, न्हावेलीं, आमोणा, हरवळे या भागातून पायलट म्हणून नागरिकांची सेवा बजावणाऱ्या सर्वांना मुख्यमंत्री सावंत यांनी रेनकोट वितरण केले. सोमवारी सुर्ला पंचायत कार्यालयात सुर्ला गावातील पायलट सेवा देणाऱ्यांना मुख्यमंत्री सावंत यांच्या वतीने भाजपचे पदाधिकारी सुभाष फोंडेकर यांनी रेनकोट दिले. यावेळी सरपंच चंद्रकांत घाडी याची उपस्थिती होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!