RAIN UPDATE | उद्या पुन्हा मुसळधार

रेड अलर्ट जारी; आतापर्यंत राज्यात ६८.५० इंच पाऊस

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्यात पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग सुरू असताना उद्या 18 जुलै रोजी पुन्हा मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज गोवा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय. त्यामुळे राज्यात उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.

हेही वाचाः येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचा राजनीमा देणार? वाचा कारण काय?

ऑरेंज अलर्ट 20 जुलैपर्यंत वाढवला

गोवा हवामान खात्याने राज्यात 20 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट वाढवला आहे. 15 जुलै रोजी जारी केेलेल्या पत्रकानुसार गोव्यात पावसाच्या हालचाली वाढण्याची शक्यता होती. त्यानुसार 18 आणि 19 रोजी पावसाचं प्रमाण वाढणार आहे. गोव्यात एक किंवा दोन ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (तासांत 20 सेमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे) होण्याची शक्यता आहे, असं हवामान खात्याने म्हटलंय.

हेही वाचाः बिगर गोमंतकीयांमुळे गोव्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ

आतापर्यंत राज्यात ६८.५० इंच पाऊस

रविवारपासून राज्यात पावसाने जोर धरलाय. राज्याच्या विविध भागात पाऊस संततधार कोसळतोय. या पावसाने सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत करून सोडलंय. अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. तसंच अनेकांची घरं जमिनदोस्त झाली आहेत. नद्या दुथडी भरून वाहत असून राज्यातील बहुतेक धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. आतापर्यंत राज्यात ६८.५० इंच पावसाची नोंद झालीये.

समुद्र पातळीवर ट्रफ महाराष्ट्र किनारपट्टीवरून कर्नाटक किनारपट्टीवर सरकतंय

समुद्र पातळीवर ट्रफ महाराष्ट्र किनारपट्टीवरून कर्नाटक किनारपट्टीवर सरकत आहे. हवामान अंदाजानुसार पाऊस पडण्याबरोबरच 50 किमी प्रतीतास वेगाने वारे वाहणार आहे. चालू सक्रिय पावसाळ्याच्या परिणामाचा विचार करता, 18 जुलै रोजी उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांसाठी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. 19 जुलैच्या परिस्थितीवर सध्या लक्ष ठेवलं जात आहे.

हेही वाचाः नोकरीच्या शोधात आहात, मग वाट कसली पाहताय? हे वाचाच!

पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता

पावसाच्या वाढत्या जोरामुळे भूस्खलन आणि पूरसदृष्य स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे असुरक्षित भागांवर देखरेख ठेवण्यास सांगितलं आहे. नद्यांच्या पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवलं जात आहे. तसंच आवश्यक काळजी घेतली जावी, असंही हवामान खात्याने सांगितलंय.

हा व्हिडिओ पहाः FARMERS | रस्त्याच्या दुतर्फा साचलेल्या पाण्यामुळे शेतीचं नुकसान

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!