RAIN UPDATE | पावसाने गाठली नव्वदी

आज मुसळधार पावसाची शक्यता

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: गेल्या आठवड्यात कमी झालेल्या पावसाचा वेग पुन्हा वाढला आहे. राज्यात आतापर्यंत ९० इंच पावसाची नोंद झाली आहे. उत्तर गोव्यात ९७.५२ इंच पावसाची नोंद झाली आहे, तर दक्षिण गोव्यात ८३.२१ इंच पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. दक्षिण गोव्यापेक्षा उत्तर गोव्यात पावसाचा जोर खूप आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुधवारी राज्यात काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

हेही वाचाः डिचोली भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी अनिकेत चणेकर

राज्यात १ जून ते आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस

राज्यात १ जून ते आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस पेडणे तालुक्यामध्ये पडला आहे. पेडणे तालुक्यात सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे. पेडण्यात आतापर्यंत १२० इंच पावसाची नोंद झाली आहे. तर वाळपई १०१ इंच पावसाची नोंद झाली आहे. केपेत आतापर्यंत १०० इंच पावसाची नोंद झाली आहे आणि सांगे येथे आतापर्यंत ९७.१ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी पावसाची नोंद मडगाव येथे झाली आहे. मडगावमध्ये आतापर्यंत फक्त ७३.१ इंच पावसाची नोंद झाली आहे. प्रत्येक वर्षी वाळपई आणि पेडणे भागात पावासाची सरासरी जास्त असते.
१ जूनपासून आतापर्यंत साखळीत ९२ इंच, ओल्ड गोवा ९१ इंच, काणकोण ७६ इंच, दाबोळी ७५ इंच, पणजी ८४ इंच, मुरगाव ७५ इंच, म्हापसा ९२.१ इंच पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचाः जनसेवा हीच नारायण सेवा: सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य

आजही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

अरबी समुद्रातील हवामान स्थितीचा विचार करता आजही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर असल्यानं आज मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशाराही देण्यात आला आहे. गेल्या चोवीस तासांत फोंडा येथे ३० मिलिमीटर, सांगे येथे ३५ मि. मी., वाळपई येथे २४ मि.मी, तर जुने गोवे येथे २ मि, मी. पावसाची नोंद झाली. इतर भागात तुरळक पाऊस पडला. राज्यात २४ जुलैपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत असून येत्या काही दिवसांतही असाच पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | Crime | Follow Up | केतन भाटीकर यांचे आरोप संशयितानं फेटाळाले

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!