RAIN UPDATE | आज, उद्या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागाकडून राज्यात यलो अलर्ट जारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यात सोमवारी काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. मंगळवारी सकाळी राजधानीत पावसाने काही वेळासाठी जोर धरला होता. आज आणि उद्या राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज गोवा हवामान खात्याने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला गेलाय.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा

कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून, कोटा, गया, कोलकाता ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. पूर्व राजस्थान परिसरावर कमी दाबाचं क्षेत्र निवळून गेलं आहे. तर बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मंगळवारी सकाळी राजधानीला पावसाने झोडपून काढलं. तसंच राज्यात ढगाळ हवामान होऊ लागलंय. त्यामुळे दुपारनंतर काही ठिकाणी पावसाला सुरुवात होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त केली गेलीये.

आज, उद्या यलो अलर्ट जारी

पुढील दोन दिवस हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकतं. त्यामुळे राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होणार असते, तेव्हा कायम हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करत सावधान राहण्याची सूचना देण्यात येते. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास दैनंदिन कामं रखडू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो.

मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबण्याची शक्यता

मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबणार असल्याची शक्यता आहे. वातावरण बदलांमुळे सलग तिसऱ्या वर्षी परतीच्या पावसाला विलंब झाला आहे.  सप्टेंबर मध्यानंतर मान्सून माघारी फिरत असतो. मात्र, यावर्षी सप्टेंबर अखेर उजाडणार असल्याची माहिती आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे पाऊस लांबण्याची चिन्ह आहेत.

हा व्हिडिओ पहाः NO CASINO IN PEDNE | चांगल्या प्रकल्पांचं स्वागत, मात्र पेडणेत कॅसिनोला विरोधच

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!