RAIN UPDATE | सतर्क रहा! पावसाचा जोर वाढणार

सोमवार, मंगळवारी ऑरेंज अलर्ट जारी; गोवा हवामान खात्याकडून इशारा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्याभरात अनेक ठिकाणी मंगळवारी सांगे, पणजी, साखळी, केपे, म्हापसा, पेडणे, फोंडा येथे मुसळधार पाऊस झाला. आजपासून ते ७ सप्टेंबरपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात गोवा हवामान खात्याकडून सोमवार, मंगळवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. गोवा हवामान खात्याकडून तसा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे गोंयकारांना याची नोंद घेण्यास सांगण्यात आलंय.

हेही वाचाः सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणः गोमेकॉकडून तीन सदस्यीय वैद्यकीय मंडळाची स्थापना

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र

बंगालच्या उपसागरात तयार होणारं कमी दाबाचं क्षेत्र आणि त्याच्या आतल्या भागातील प्रवासाच्या शक्यतेमुळं उद्यापासून ते 7 सप्टेंबर दरम्यान परत एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच, संपूर्ण राज्यात पावसाचा प्रभाव असण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.

मुसळधार पाऊस (२४ तासांमध्ये >६.४ सेंमी) ५ सप्टेंबरपासून सुमारे ५ दिवसांसाठी होण्याची शक्यता आहे. 6 आणि 7 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस (24 तासांमध्ये> 11.5 सेमी) होण्याची शक्यता आहे, असा अंदाज गोव्याच्या हवामान खात्याने वर्तवला आहे.

हेही वाचाः VIDEO: गुजरातमध्ये भररस्त्यात सिंहांचा गाईवर हल्ला; व्हिडिओ वायरल

सोमवार, मंगळवार राज्यात ऑरेंज अलर्ट जारी

सोमवार, मंडळवार म्हणजे 6 आणि 7 सप्टेंबर रोजी राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. ऑरेंज अलर्टमध्ये रेड अलर्टपेक्षा थोडी कमी धोकादायक स्थिती असते, पण इथेही यंत्रणांनी सतर्क राहणं गरजेचं असतं. ऑरेंज अलर्टमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला असतो. इथेही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होण्याचा धोका असतो. त्यामुळे गोंयकारांना सावधान राहण्यास सांगण्यात येतं.

जून ते ३१ ऑगस्टपर्यंत २६०३.४ मिलिमीटर पावसाची नोंद

जूनमध्ये पावसाला सुरुवात झाल्यापासून ते ३१ ऑगस्टपर्यंत २६०३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत ३१ ऑगस्टपर्यंत पावसाचं प्रमाण ३ टक्के कमी आहे. पावसाळी ढग ओडीशा, छत्तीसगडच्या दिशेने सरकत असल्यामुळे राज्यातील पावसाचं प्रमाण कमी होऊन, पुढील चार दिवस तुरळक पाऊस पडणार असल्याची माहिती वेधशाळेने दिली आहे.

हा व्हिडिओ पहाः Doctor Attack | डॉ. तिळवे हल्ला प्रकरणी मुख्य संशयिताला जामीन

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!