राज्यात मंगळवार, बुधवारी जोरदार पावसाची शक्यता

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
पणजी : राज्यात पुढच्या 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 24 आणि 25 नोव्हेंबरला जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे 23 तारखेला हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यताय.
हिवाळ्यात पाऊस?
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टी तयार झाला आहे. याची तीव्रता वाढल्यानं राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या आठवड्यात पाऊस होण्याची शक्यात आहे, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे उकाडा वाढलाय. तापमान वाढल्यानं लोकही घामाघूम झालेत. वाढत्या तापमानाचा परिणाम आरोग्यावरही होताना पाहायला मिळतोय. अशातच आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.