छत्रीशिवाय घराबाहेर पडू नका! पुढचे 48 तास मुसळधार पावसाचा इशारा

येणारे चार दिवस जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

पणजी : राज्यात पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवस झालेल्या पावसानं आधीच तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा पसरलाय. अशातच पुढचे चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागानं राज्यासह दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटकामध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वर्तवलाय. भारतीय हवामन खात्याच्या चक्रीवादळ इशारा विभागानं हा अंदाज वर्तवला आहे.

13 ऑक्टोबर रोजी मुसळदार पाऊस होणार असून राज्यासह महाराष्ट्रातील दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस असं सांगण्यात आलं आहे. हा पाऊस 20 सेंटिमीटर प्रतिदिनपेक्षा कमी असेल असं भाकित वर्तवण्यात आलं आहे. दुसरीकडे 14 ऑक्टोबरलाही मुसळधार पावसाची शक्यताय. फक्त गोवाच नव्हे तर कर्नाटकातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिम-उत्तर पश्चिमेकडे सरकला आहे. त्यामुळे या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून सुरु झालेला पाऊस येत्या दोन दिवसांत आणखी जोर पकडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुसळधार पावसाने हैदराबाद आणि आंध्रमधील अनेक भागाला झोडपून काढलंय. आता राज्यातही मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!