रविवारी राज्यात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद, मुसळधार बरसतच राहणार

धुव्वाधार पावसानं रविवारी झोडपलं

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : रविवारी राज्यात मुसळधार पावसाचा जोर दिवसभर कायम होता. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्टच्या दिवशी राज्यात जोरदार पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालंय. १५ जुलैपासून धुव्वाधार पावसाने राज्याला झोडपून काढण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे रविवारी गेल्या काही दिवसातल्या रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

किती पाऊस झाला?

आतापर्यत राज्यात ७० इंच एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. राज्यात १५ जुलै ते १८ जुलै या चार दिवसात सुमारे ११ इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या ४ दिवसांपैकी सर्वात जास्त पाऊस रविवारी झाला असल्याची आकडेवारी समोर आली आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक सखल भाग जलमय झाले होते. तर नद्यांच्या पाणीपातळीही वाढ नोंदवण्यात आली आहे.

सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत पणजीत ४.४५, पेडण्यात २.७७, जुने गोवेत ५.४५, मुरगावात ५.८२, तर काणकोणमध्ये ३.३० इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे.

संपूर्ण आठवडा जोर कायम राहणार

१५ जुलै रोजी राज्यात ४.८ इंच पावसाची नोंद झाली. तर १६ जुलै रोजी २.४ इंच पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर १७ जुलै रोजी २.७ इंच तर रविवारी म्हणजेच १८ जुलैला सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या ४ दिवसांतला रेकॉर्डब्रेक पाऊस रविवारी झाला आहे. दरम्यान, आता रेड अलर्टमध्ये वाढ करण्यास आली आहे. रविवारप्रमाणेच सोमवारीही पावसाचा जोर कायम राहण्याच शक्यता असल्यामुळे सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं जातंय. त्यामुळे सोमवारीही धुव्वाधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून येणारा संपूर्ण आठवडा पावसाचा जोर कायम असणार आहे.

हेही वाचा : TOP 25 | महत्त्वाच्या 25 घडामोडींचा वेगवान आढावा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!