RAIN | LAND SLIDE | दरड कोसळल्याने हा घाटरस्ता बंद

दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु; वाहतूक खोळंबली

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः धुव्वाधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे राज्यातील रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. कर्नाटकच्या दिशेने जाणारा आणि जोडणारा महत्त्वाचा मार्ग मुसळधार पावसानं प्रभावित झालाय. अनमोड घाटात दरड कोसळल्याचं वृत्त समोर येतंय. दरड कोसळल्याने ट्रॅफिक जॅम होऊन या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न आता सुरु आहेत. सध्या ही दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून. वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

अनमोड घाटात दरड कोसळली

अनमोड घाटात दुधसागर मंदिरापासून खालच्या बाजूला गोवा हद्दीत दरड कोसळल्याची माहिती आहे. दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. गोवा-कर्नाटक मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र दरड कोसळल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय.

हेही वाचा:मडगावात ‘बर्निंग कार’चा थरार…

राज्यात सकाळपासून पावसाची दमदार बॅटिंग

राज्यात सकाळपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरूए. राजधानी पाणजीसह राजाच्या विविध भागात पाणी साचून रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलंय. या सगळ्यात प्रवाशांनामात्र मोठा त्रास सहन करावा लागतोय. मेरशी जंक्शनपासून पणजीत येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. मिरामार सर्कल, बांबोळी, १८ जून रस्ता इ. परिसरातही पाणी तुंबल्याने वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय.

राज्यात मुसळधार पावसानं हाहाकार

राज्यात मुसळधार पावसानं हाहाकार उडवलाय. पणजी, पेडणे, कुडचडे, फोंडा इ. ठिकाणी पूरस्थिती आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी रस्ता वाहून जाण्याच्या किंवा खचण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे एकूणच रस्ते वाहतुकीचाही बोजवारा उडालाय. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रस्ते मार्गाने जाणाऱ्यांनाही खबरदारी बाळण्याचं आवाहन करण्यात येतंय. तर दुसरीकडे पाण्यातून गाड्या न घालण्याचाही सल्ला दिला जातो आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!