सत्तरीला पावसाचा पुन्हा एकदा जोरदार तडाखा, घरातही पावसाचं पाणी

अनेक ठिकाणी पावसाचा सामान्यांना फटका

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपई : मान्सूनची प्रतिक्षा अजूनही कायम असताना सत्तरीतील गावांना मान्सूनपूर्व पावसाचा जोरदार तडाखा बसलाय. या पावसामुळे अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. सत्तरी तालुक्यातील वाळपई, होंडा या भागात जोरदार पावसानं गुरुवारी हजेरी लावली होती.

पावसाळा सुरू व्हायला अजूनही काही दिवस बाकी आहेत. मात्र गुरुवारी संध्याकाळी सत्तरी तालुक्याच्या वेगवेगळ्या भागांत पावसाने जोरदार तडाखा दिला. यामुळे वाळपई शहरातील काही घरांमध्ये पाणी घुसलं. तर होंडा येथील एसीजीएल कंपनीजवळ असलेल्या सुमन नाटेकर यांच्या घरामध्ये पाणी घुसल्यामुळे घरातील सामानाचंही नुकसान झालं. वाळपई शहरांमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नगरपालिकेच्या पावसाळापूर्व कामावरही सवाल उपस्थित झालेत.

गेल्या काही दिवसांपासून रोज हजेरी

गेल्या काही दिवसापासून सत्तरी तालुक्यात संध्याकाळच्या वेळी पाऊस पडतोय. गुरुवारी मात्र या भागाला पावसाचा जोरदार तडाखा बसला. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे पावसाला सुरुवात झाली. जवळपास ३ तास मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं.

सत्तरी तालुक्यातील अनेक गावातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं. रस्त्यावर पाणी साचल्यालं वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती. वाळपई शहरामध्ये मारुती मंदिरासमोर पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा झाला होता. यामुळे या ठिकाणी असलेल्या काटकर यांच्या घरामध्ये पाणी घुसलं. यासंदर्भात सुनील काटकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,

मारुती मंदिराच्या समोर जवळपास अर्धा मीटर पाण्याचा साठा झाला होता. यामुळे पाणी निचरा होण्यास वाट नसल्यामुळे सदर पाण्याचा प्रभाव आपल्या घरामध्ये घुसून नुकसानी झाली. वाळपई नगरपालिकेने मान्सूनपूर्व कामाच्या संदर्भात गटाराची चांगल्या प्रकारे साफसफाई न केल्यामुळे हा प्रकार कदाचित घडला असाला.

दुसरीकडे, होंडा सत्तरी येथील येथील कंपनीच्या नजीक असलेल्या नवनाथ देवस्थानजवळ असलेल्या सुमन नाटेकर यांच्या घरामध्ये पाणी घुसून सामानाची मोठ्या प्रमाणात नुकसानं झालं. या संदर्भात सुमन नाटेकर यांनी सांगितलं की,

रस्त्यावर सध्या केबल्स घालण्यासाठी चर खोदण्यात आलेले आहे. यामुळे पाण्याच्या प्रवाहाला मोकळी वाट मिळाली नसल्यामुळे पाण्याचा प्रवाह आपल्या घरामध्ये घुसला आणि आपल्या घरातील सामानाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!