वटपौर्णिमेला पावसाने लावली हजेरी!

देविदास गावकर | प्रतिनिधी
वाळपईः यंदा वटपौर्णिमा, पाऊस आणि पर्यावरण दिनाचा योगायोग जुळून आला. यावर्षीच्या वटपौर्णिमेला खुद्द वरुण देवांनी हजेरी लावली. यंदा २४ जूनला साजऱ्या झालेल्या वटपौर्णिमेला जोरदार बरसणाऱ्या पावसात वाळपईच्या मावशी गावातील सावित्रींनी भिजत वडाला फेऱ्या मारल्यात.
हेही वाचाः सिंधुदुर्गात ‘डेल्टा प्लस’ रुग्णाच्या परिसरात 6 बिल्डिंग 14 दिवसांसाठी सील !
कोरोनाचं संकट दूर होऊदे
कोरोनाचं संकट अजूनही कायम असल्याने यंदाची वटपौर्णिमा महिलांनी एकत्र येत, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून साजरी केली. ही पूजा करताना महिलांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले. सात जन्म हात पती मिळावा, या प्रार्थनेत यंदा कोरोनाचं संकट दूर होऊ दे, अशी जोड देत महिलांनी वटवृक्षाचं पूजन केलं.
वटपौर्णिमेचं महत्व
वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करायचं व्रत. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आपल्या समाजात मागच्या बराच काळापासून रुढ आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा.