पावसाची खबरबात! आज रेड तर उद्या परवा ऑरेंज अलर्ट

सकाळपासून राज्यात जोरदार पावसाची हजेरी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : गेल्या आठवड्यापासून जोरदार कमबॅक केलेल्या पावसानं सातत्या राखलं असून आज (गुरुवारी) पुन्हा एकदा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. सकाळपासूनच संपूर्ण राज्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. आतापर्यंत सरासरी ८० इंच इतक्या पावसाची नोंद करण्यात आली असून राज्यात दिवसभर पावसाच्या जोरदार सरी बरसण्याची दाट शक्यता आहे.

राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे किमान तापमानातही घट नोंदवण्यात आली आहे. धरणांच्या पाणीपातळीतही वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दुसरीकडे येत्या ७२ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, गुरुवारी अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर किनारी भागातील लोकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.

शुक्रवार आणि शनिवारी मुसळधार पाऊश बरसणार असून शनिवारी रविवारी येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून जोरदार बरसणाऱ्या पावसाच्या सरी येत्या आठवड्यातही अशाच परसण्याची शक्यता आहे.

रेड, ऑरेंज आणि येल्ले अलर्टमध्ये फरक काय?

अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो. परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. अशावेळी प्रत्येकाला एक प्रश्न पडतोच. तो म्हणजो ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट म्हणजे काय? नैसर्गिक संकटाच्यावेळीच तो का जारी केला जातो? पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकतं, अशी सुचना जारी करण्यात येते तेव्हा अलो अलर्ट जारी करतात. दैनंदिन कामं रखडू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो. ऑरेंज अलर्टमध्ये रेड अलर्टपेक्षा थोडी कमी धोकादायक स्थिती असते, पण इथेही यंत्रणांनी सतर्क राहणं गरजेचं असतं. ऑरेंज अलर्टमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला असतो.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!