बुधवारपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज

राज्यात बुधवारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : रविवारी राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पावसानं हजेरी लावली. दरम्यान, पुढचे चारही दिवस राज्यात जोरदार पाऊस कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं ऑरेंज अलर्टही जारी केलाय.

जोरदार कमबॅक!

राज्यात गेल्या आठवड्यात पावसाचा फारसा जोर पाहायला मिळाला नव्हता. मात्र गुरुवारपासून राज्यात वरुणराजानं दमदार पुनरागमन केलंय. गुरुवारपासून राज्यात पावसानं पुन्हा एकदा कमबॅक केलं असून आता येत्या बुधवारपर्यंत राज्यात जोरदार सरी बरसतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला असून काळजी घेण्याचं आवाहनही केलं जातंय.

हेही वाचाः शैक्षणिक संस्थांतील कर्मचार्‍यांना लसीकरण अनिवार्य

अंदाज खरे ठरले!

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे रविवारी राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस झालाय. त्याचप्रमाणे सोमवार, मंगळवार आणि बुधवारीही मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे समुद्र किनारी भागाला सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय. झारखंड आणि आसपासच्या समुद्रसपाटीपासून 6 किलोमीटरपर्यंतच्या परिसरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे राज्यात काही भागांत जोरदार पाऊस पडू शकतो, असं हवामान खात्याने म्हटलं होतं. पुढील काही दिवसांत पाऊस सक्रिय होणार असल्याचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला होता.त्यामुळे येत्या काही दिवसांत पाऊस वाढण्याची शक्यता असल्याचंही हवामान खात्याने म्हटलं होतं.

हेही वाचाः दोनपेक्षा अधिक मुले असल्यास कुटुंब गमावणार हे सरकारी लाभ

आता यलो आणि ऑरेंज अलर्ट म्हणजे काय? हे जाणून घेऊ.

अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो. परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. अशावेळी प्रत्येकाला एक प्रश्न पडतोच. तो म्हणजो ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट म्हणजे काय? नैसर्गिक संकटाच्यावेळीच तो का जारी केला जातो? पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकतं, अशी सुचना जारी करण्यात येते तेव्हा अलो अलर्ट जारी करतात. दैनंदिन कामं रखडू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो. ऑरेंज अलर्टमध्ये रेड अलर्टपेक्षा थोडी कमी धोकादायक स्थिती असते, पण इथेही यंत्रणांनी सतर्क राहणं गरजेचं असतं. ऑरेंज अलर्टमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला असतो.

हेही वाचाः ‘आप’ कार्यकर्त्यांनी केक देऊन साजरी केली पक्षांतराची वर्षंपूर्ती

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!