रेल्वे दुपदरीकरणाच्या कामाचा फटका! कोकण रेल्वे मार्गावरील ‘या’ ४ गाड्या रद्द

तर काही गाड्यांच्या वेळापत्रकार महत्त्वपूर्ण बदल

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : कोकण रेल्वेनं ३० आणि ३१ तारखेला जर तुम्हा प्रवास करणार असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावरील चार गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर चार गाड्यांच्या वेळेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

कोणकोणत्या गाड्या रद्द केल्या?

३० तारखेला म्हणजेच उद्या लोकमान्य टिळक टर्मिनल्सहून सुटणारी गाडी क्र. ०१०८५ रद्द करण्यात आली आहे.

२. मुंबई सीएसएमटी- मडगाव फेस्टीवल स्पेशल गाडीदेखील रद्द करण्यात आली आहे. या गाडीचा नंबर ०१११३ असा असून उद्याची ही गाडी रद्द करण्यात आली आहे.

३. त्याचप्रमाणे उद्याची ०१११४ मडगाव- मुंबई फेस्टीवल स्पेशल गाडीदेखील रद्द करण्यात आली आहे.

४. दरम्यान, ३१ तारखेला धावणारी ०१०८६ मडगाव-लोकमान्य टिळक ही गाडीदेखील रद्द करण्यात आली आहे.

का रद्द केल्या गाड्या?

कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे दुपदरीकरणाचं काम सुरु आहे. रोहा ते वीर या दरम्यानच्या पट्ट्यात हे रेल्वे दुपदरीकरणाचं काम सुरु आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. काही गाड्या या उशिराने धावण्याची शक्यता आहे. तर काही गाड्या या पूर्णपणे रद्द करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – वास्को-चेन्नई रेल्वे सेवा सुरू

कोणत्या गाड्यांच्या वेळेत बदल?

मडगाव-मुंबई गाडी क्र. ०१११२ ही गाडी २९ ऑगस्टला चार तार उशिरानं असेल. तर मंगळुरु-मुंबई ही गाडीदेखील चार ते सव्वा चार तास उशिरानं असेल. तसंच उद्या (३० ऑगस्ट) मडगाव- हजरत निजामुद्दीन विशेष गाडी ३ तास उशिराने तर मडगाव-मुंबई विशेष गाडी दोन तास उशिरानं धावणार आहेत. सर्व प्रवाशांनी त्याप्रमाणे नियोजन करावं, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

हेही वाचा – रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी आता ‘ही’ कागदपत्रे आवश्यक! IRCTC करत आहे तयारी

हेही वाचा – दूधसागरजवळ मोठी दुर्घटना टळली! दरड कोसळल्यानं प्रवासी रेल्वेगाडी रुळावरुन घसरली

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!