कळंगुटमध्ये जुगारअड्ड्यावर छापा

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी
पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने मटका जुगारप्रकरणी नाईकावाडो-कळंगुट येथील एका अड्डयावर वर छापा टाकून अहमद शेख, जोझफ डिसोझा, संतोष गोसावी, गोविंदराव राणे आणि यासिनसाब बेपारी या पाच जणांना अटक केली. गुन्हा शाखेने संशयितांकडून 1 लाख 63 हजार 410 रुपये व इतर मटका जुगार साहित्य जप्त केले. अटक करण्यात आलेल्या संशयितांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली.
गुन्हा शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईकावाडो-कळंगुट येथील ब्रागांझा इस्पितळजवळ एका कार्यालयात मटका जुगार सुरू असल्याची माहिती गुन्हा शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हा शाखेचे अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दिनेश पिकुळकर, संजय पेडणेकर, पोलिस कॉन्स्टेबल नवीन पालयेकर साईनाथ नाईक आणि कल्पेश शिरोडकर या पथकाने मंगळवारी सायंकाळी जुगार अड्ड्यावर छापा मारून अहमद शेख, जोझफ डिसोझा, संतोष गोसावी, गोविंदराव राणे आणि यासिनसाब बेपारी या पाच संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली.
या वेळी पथकाने संशयिताकडून 1 लाख 63 हजार 410 व इतर मटका जुगार साहित्य जप्त केले. त्यानंतर गुन्हा शाखेचे हवालदार कृष्णा माजिक यांनी संशयिताविरोधात गोवा दमण व दीव सार्वजनिक जुगार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.
शयितांची नंतर हमीवर सुटका करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी प्राथमिक चौकशी केली असता, संशयित कळंगुट येथील वसंत शिरोडकर उर्फ दोबीट याच्यासाठी काम करित असल्याची माहिती समोर आली आहे.