बलात्कार प्रकरणातील संशयित रहिम खान याला उत्तरप्रदेश मुरादाबाद येथून अटक

मडगाव पोलिस पथकाची कारवाई; पीडित युवतीच्या आईलाही अमरोहा येथून केली अटक; उद्या आणणार गोव्यात

अजय लाड | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गेल्या तीन वर्षांपासून लग्नाचं आमिष दाखवून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मातृत्व लादणं तसंच आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी रहिम खान याला उत्तरप्रदेश मुरादाबाद येथून अटक केली आहे. पीडित युवतीच्या आईलाही अमरोहा येथून अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी दोघा संशयितांना गोव्यात आणलं जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.

हेही वाचाः पावसाची खबरबात! आज रेड तर उद्या परवा ऑरेंज अलर्ट

मडगाव पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक विभावरी गावकर यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने कित्येक महिने फरार असलेल्या संशयित आरोपी रहीम खान याला अटक केली. मुरादाबाद येथील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून गावकर यांचं पथक संशयिताला घेऊन गोव्याकडे येण्यासाठी निघालं आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत संशयित आरोपीला गोव्यात आणण्यात येणार असल्याचं समजतंय.

हेही वाचाः ग्रामीण भागात मारुती सुझुकीला वाढती मागणी

काय आहे प्रकरण?

मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित रहीम खान याने लग्नाचं आमिष दाखवून पंधरा वर्षीय मुलीवर २०१८ ते १८ जून २०२१ दरम्यान अनेकवेळा अत्याचार केले. दरम्यान ही मुलगी चार महिन्याची गरोदर राहिली असता जबरदस्तीने तिला गर्भपात करण्यास भाग पाडलं. अखेर मुलीचा गर्भपात झाल्यावर संशयिताने पीडित मुलीला लग्न होणार नसल्याचं सांगितलं. संशयित आणि आईचा छळ यामुळे त्रस्त मुलीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वेळेवर उपचार मिळाल्याने ती बचावली.

हेही वाचाः एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका, सरकार ‘या’ सुविधा काढून घेण्याच्या तयारीत

आवढा व्हिएगास यांनी केलेल्या तक्रारीमुळे प्रकार उघडकीस

याप्रकरणी वन स्टॉप सेंटरच्या प्रमुख आवढा व्हिएगास यांनी मडगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानं हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी संशयित रहीम खान याच्याविरुद्ध भादंसंच्या ३७६, ३०६, ३२३, १०९, बाल कायदा आणि पोक्सॉ कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी संशयिताच्या आईवरही छळवणूक आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

हेही वाचाः जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेल-टाटा एकत्र

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक पंकज कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखाली मडगाव पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक विभावरी गावकर याप्रकरणी तपास केलाय.

हा व्हिडिओ पहाः Video | अमर नाईक हत्याकांडाचा मुख्य संशयित विदेशात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!