गोव्यातील पहिल्या कचरा व्यवस्थापन स्टार्ट-अपची घोडदौड…

कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात इतर गोमंतकीयांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील गोव्यातील पहिले स्टार्टअप असणाऱ्या यिंबी (इनोव्हेटिव्हा वेस्ट एड अँड मॅनेजमेंट)ची वाटचाल मुख्यमंत्र्यांच्या “स्वयंपूर्ण गोवा” च्या व्हिजनच्या मार्गावर सुरू आहे. या स्टार्टअपची स्थापना कोरोना महामारीच्या प्रारंभी झाली असूनही यिम्बिने नफा कमावला आहे आणि एचएनआय तसेच कॉर्पोरेट फर्मकडून गुंतवणूक आकर्षित केली आहे. यिंबी ही गोव्यातील स्टार्ट-अप असून कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात इतर गोमंतकीयांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत.
हेही वाचाःआंध्रच्या पोलिसांनी गोव्यातील एकाला थेट उचलल्याचा आरोप, ‘हे’ आहे कारण…

“शहरी आणि ग्रामीण हवामान बदल आणि शाश्वतता शिखर परिषद”

उद्घाटन समारंभाला पर्यटन, आयटी, मुद्रण आणि स्टेशनरी मंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खवंटे, म्हापसाचे आमदार तसेच जीएसायडिसीचे उपाध्यक्ष जोशुआ डिसूझा आणि म्हापसा नगरपरिषदेच्या सभापती शुभांगी वायंगणकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात दिवंगत श्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या स्मरणार्थ “शहरी आणि ग्रामीण हवामान बदल आणि शाश्वतता शिखर परिषद” सुरू करण्याची घोषणा केली. ही घोषणा रिस्पॉन्सिबल अर्थ फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था आणि यिंबीच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.
हेही वाचाःनियम धाब्यावर बसवून महाराष्ट्रातून गोव्यात बेकायदा…

नफा फाउंडेशनसाठी दान करण्यात येणार

या कार्यक्रमामध्ये नवीन लोगो आणि ई-कॉमर्स वेबसाइटचे अनावरणही करण्यात आले. यामध्ये इको-फ्रेंडली उत्पादनांची विस्तृत श्रेणी असून यामधील नफा फाउंडेशनसाठी दान करण्यात येणार आहे. शुभारंभप्रसंगी रोहन खवंटे म्हणाले की, स्टार्ट-अप्सचा योग्य उपक्रम बनून त्यांचा व्यवसाय वाढवायचा होता. म्हणून यिम्बीचा हा पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला. मला आनंद आहे की गौरव पोकळे यांनी कचरा गोळा करण्यापासून ते वीज निर्मितीपर्यंत आणि बरेच काही पर्याय आणि उपाय शोधून काढले आहेत. मी पाहिले आहे की एक उद्योजक म्हणून ते आपला जीव ओतून उत्कटतेने जो उपक्रम हाती घेतात तो पूर्ण करतात.
हेही वाचाःमंत्री गोविंद गावडेंनी पुन्हा सुदिनना डिवचले!

यिम्बी त्यांच्या मूल्यांवर ठामपणे कार्यरत

जोशुआ डिसूझा म्हणाले, “यिम्बीची कल्पना ‘येस इन माय बॅकराउंड’ अशी आहे. या वृत्तीची जोपासना चांगले भविष्य घडविण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करणे आवश्यक आहे. कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याच्या या उत्कृष्ट उपक्रमाबद्दल मी गौरव पोकळे यांचे अभिनंदन करतो. किंबहुना, ऑफिसमधील बहुतांश इंटिरिअर रिसायकल केलेल्या वस्तूंपासून कसे बनवले गेले असून हे कौतुकास्पद आहे. मला आनंद आहे की यिम्बी त्यांच्या मूल्यांवर ठामपणे कार्यरत आहे.”
हेही वाचाःकाळजी घ्या! गोव्यात पुढील पाच दिवस उकाड्याचे…

लवकरच देशभरात शाखा सुरू करण्याबाबत आशावादी

यिंबीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ गौरव पोकळे म्हणाले, “कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील व्यवस्थापनावर वन स्टॉप सोल्युशन देणारी यिंबी ही देशातील एकमेव कंपनी असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. सध्या आम्ही गोव्यात संपूर्णपणे कार्यरत असून लवकरच देशभरात शाखा सुरू करण्याबाबत आशावादी आहोत. राज्यातील शाश्वत विकासाच्या दिशेने हे एक पाऊल पुढे आहे.
हेही वाचाःदोन ट्रकचा अपघात ; एक रस्त्याच्या बाजुला कलंडला…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!