केपे भाजपतर्फे मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन
हयात, उत्पन्न दाखले आणि कांद्याबाबत दिलासा

Goan Varta Live | प्रतिनिधी
सावर्डे : राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांसाठी हयात व उत्पन्न दाखल्याबाबत दिलासा दिल्यानं केपे भाजपतर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांचं अभिनंदन करण्यात आलं.
पत्रकार परिषदेत केपेचे नगराध्यक्ष तथा भाजप मंडळ अध्यक्ष दयेश नाईक यांनी सांगितले की, उत्पन्न व हयातीसंबंधीच्या दाखल्यांसाठी नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागत होतं. मात्र मुख्यमंत्री सावंत यांनी ही समस्या लक्षात घेउन डेडलाईन रद्द केली. यामुळं गोमंतकीयांना मोठा दिलासा मिळाला.
महागाईमुळे त्रासलेल्या लोकांना स्वस्त दरात कांदे देण्याचा निर्णय अभिनंदनीय आहे. त्याबद्दल केपे भाजपच्या वतीनं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आपण आभार मानत असल्याचं नाईक म्हणाले.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.