आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त अटल सेतूवर जांभळ्या रंगाची रोषणाई…

३ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनानिमित्त पर्वरी येथील अटल सेतूवर जांभळ्या रंगाची रोषणाई करण्यात आली आहे. दरवर्षी ३ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. दिव्यांगांच्या कल्याणासाठी आणि त्यांना समान हक्क मिळावे या उद्देशांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
हेही वाचाःराज्यात प्रथमच दिव्यांगांसाठी राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांचे आयोजन…

दिव्यांगांसंबंधित गोष्टींसाठी जांभळा रंग अधिकाधिक वापरला जातोय

अलीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर दिव्यांगांसंबंधित गोष्टींसाठी जांभळा रंग अधिकाधिक वापरला जात आहे. जांभळा रंग दिव्यांग व्यक्तींची कार्यशक्ती आणि त्यांनी दिलेल्या समाजातील योगदानाबद्दल नवीन सकारात्मक कथन दर्शवतो, असे राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर म्हणाले.
हेही वाचाःGoldy Brar detained: मुसेवालाच्या हत्येचा मास्टरमाईंड अखेर गजाआड

6 ते 8 जानेवारी 2023 कालावधीत ‘पर्पल फेस्ट’

ते पुढे म्हणाले, “ त्यामुळेच राज्य दिव्यांग आयोगाने आयोजित सर्वसमावेशक महोत्सवाला पर्पल फेस्ट असे नाव देण्यात आले आहे. हा महोत्सव राज्य दिव्यांगजन आयोग, समाज कल्याण संचालनालय आणि मनोरंजन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 6 ते 8 जानेवारी 2023 या कालावधीत होणार आहे.
हेही वाचाःइस्रो हेरगिरी प्रकरणातील आरोपींना तूर्त जामीन नाहीच…

पर्पल फेस्ट भारतातील पहिला सर्वसमावेशक महोत्सव

पर्पल फेस्ट हा भारतातील अशा प्रकारचा पहिला सर्वसमावेशक महोत्सव आहे, जिथे दिव्यांग व्यक्तींच्या कार्याचा साजरा होईल. ही भारताची पर्पल चळवळ आहे ज्याचा उद्देश सर्वांसाठी एक स्वागतार्ह आणि सर्वसमावेशक जग निर्माण करण्यासाठी आपण कसे एकत्र येऊ शकतो हे दाखवणे आहे, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचाःमोरजी येथील श्री मोरजाई देवीचा 5 रोजी जत्रोत्सव…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!