पंजाबकडून गोव्याचा १२-०ने पराभव…

हॉकी इंडिया सब-ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिप २०२२

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : हॉकी पंजाबने हॉकी गोवाचा १२-०ने पराभव करत गोव्याचे १२व्या पुरुषांच्या हॉकी इंडिया सब-ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. या सामन्याचे आयोजन हॉकी अॅस्ट्रो टर्फ, पेडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले आहे.
हेही वाचाःगुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये…

गोव्याच्या संघाने एकामागोमाग एक चुका केल्या

पंजाबने पहिल्या हाफमध्ये ३ गोल करताच यजमान गोव्याच्या संघाने आक्रमणाऐवजी बचावात्मक हॉकी खेळवण्यावर भर दिला. यानंतर गोव्याच्या संघाने एकामागोमाग एक चुका केल्या व सामन्यावरील नियंत्रण गामवले. पहिल्या क्वार्टरमध्ये अतिशय खराब कामगिरी केल्यानंतर गोव्याच्या संघाने दुसऱ्या सत्रात शानदार प्रदर्शन केले मात्र ते पंजाबच्या ३-० गोलला प्रत्युत्तर देऊ शकले नाहीत व गोलफरक पहिल्या हाफनंतरही ३-० असाच राहिला.
हेही वाचाः’या’ तालुक्यात उभारणार आयआयटी प्रकल्प…

गोव्यावर लागोपाठ नोंदवले तीन गोल

तिसऱ्या क्वार्टरमध्ये गोव्याला चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला व याचा फायदा घेत पंजाबच्या संघाने गोव्यावर लागोपाठ तीन गोल नोंदवले. यानंतर गोव्याच्या संघावर पंजाबने आणखी चार गोलांची नोंद केली. सामना संपला तेव्हा गोव्याला १२-०ने पराभव स्वीकारावा लागला व अशा प्रकारे या स्पर्धेतील गोव्याचे आव्हान संपुष्टात आले. दिवसातील इतर सामन्यांमध्ये हॉकी बंगालने तामिळनाडू संघाचा ४-१ गोलने पराभव केला तर आणखी एका सामन्यात हॉकी चंदीगडने आसाम हॉकीवर ११-२ गोलने मात केली. याशिवाय दिवसभारत झालेल्या आणखी एका सामन्यात मध्य प्रदेशच्या संघाने महाराष्ट्र संघाचा ८-०ने पराभव केला.
हेही वाचाःओबीसी दाखल्यासाठी ‘ती’ अट रद्द करावी…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!