पेडणेतील पुनीत तळवणेकरला पुण्यात ‘भूषण पुरस्कार’ प्नदान…

Goan Varta Live | प्रतिनिधी
पेडणे : ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन पुणे आयोजित जिल्हास्तरीय सन्मान सोहळ्यात वारखंड पेडणे गोवा येथील इयत्ता बारावीत शिकणाऱ्या पुनित मनोहर तळवणेकर यांचा पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते ‘भूषण पुरस्कार’ (यंग अचीवर ऑफ गोवा) प्रदान करण्यात आला.
हेही वाचाःFrench Teacher Award : प्रा. क्षमा धारवाडकर यांना उत्कृष्ट फ्रेंच शिक्षक पुरस्कार प्रदान…
पुनीत एकमेव विद्यालयीन शिक्षण घेणारा विद्यार्थी
अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने पद्मश्री पुरस्कार प्राप्त पोपटराव पवार उपस्थित होते. या जिल्हास्तरीय सन्मान सोहळ्यात पुनीत तळवणेकर हा एकमेव विद्यालयीन शिक्षण घेणारा विद्यार्थी होता.
हेही वाचाः२८ निरीक्षकांच्या बदल्या…
एक विद्यार्थी या नात्याने पुनीतचा आम्हा सर्वांना खूप अभिमान
पेडणे सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उपप्राचार्य कीर्तीमाला परब यांनी पुनीतचे अभिनंदन करताना सांगितले की, पूनितचे हे यश खूपच कौतुकास्पद आहे. पुनीत भूषण पुरस्काराने सन्मानित होऊन आमच्या विद्यालयाची मान उंचावलेली आहे. एक विद्यार्थी या नात्याने पुनीतचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. एवढ्या लहान वयात मोठ्या पुरस्काराने सन्मानित होणे आणि ते सुद्धा पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते त्या पुरस्काराचा स्वीकार करणे ही खूप मोठी गोष्ट आहे असे सांगून पुण्यातला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पुनीतच्या यशाबद्दल पेडणे तालुक्यातून कौतुक होत आहे.
हेही वाचाःचार तरुणींचा सेल्फीने घेतला बळी…