जनसंपर्क म्हणजे चांगली प्रतिमा आणि सदिच्छा राखणे: पिल्लई

रायबंदर येथील हॉटेल फर्न कदंब येथे पॅन-इंडिया प्रोफेशनल कौन्सिल आयोजित दोन दिवसांच्या १५ व्या ग्लोबल कम्युनिकेशन कॉन्क्लेव्हचे उद्घाटन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया (पीआरसीआय) रायबंदर येथील हॉटेल फर्न कदंब येथे आज पॅन-इंडिया प्रोफेशनल कौन्सिल आयोजित दोन दिवसांच्या १५ व्या ग्लोबल कम्युनिकेशन कॉन्क्लेव्हचे उद्घाटन केलं. ‘नवीन दशकात कम्युनिकेशन – मेगा ट्रेंडचे मॅपिंग’ ही या कॉन्क्लेव्हची संकल्पना आहे.

भारताला प्राचीन काळापासून जनसंपर्काची समृद्ध परंपरा

या प्रसंगी बोलताना राज्यपाल म्हणाले, एरिस्टॉटलने “मनुष्य स्वभावाने एक सामाजिक प्राणी आहे” असं नमूद केलंय. तसं असेल तर प्रत्येक पुरुष आणि स्त्री जो सामाजिक असण्यावर विश्वास ठेवतो त्याला जनसंपर्क आणि दळणवळणाला त्याचा एक भाग बनवावं लागतं. या संकल्पना प्राचीन काळापासून एक ना कोणत्या स्वरूपात अस्तित्वात आहेत. भारताला प्राचीन काळापासून जनसंपर्काची समृद्ध परंपरा आहे. PRCI चा चाणक्यच्या नावावर पुरस्कार आहे ही वस्तुस्थिती ही आमच्या क्षेत्रातील तज्ञतेची पावती आहे.

जनसंपर्क म्हणजे समाजात चांगली प्रतिमा आणि सदिच्छा राखणं

ते पुढे म्हणाले की, विषय म्हणून जनसंपर्क आणि दळणवळण गेल्या शंभर वर्षांमध्ये अधिक औपचारिक, संस्थात्मक आणि व्यावसायिक बनलं आहे. जनसंपर्क म्हणजे समाजात चांगली प्रतिमा आणि सदिच्छा राखणं. हे व्यक्ती, संस्था आणि व्यवसायाला तसंच सरकारी क्षेत्राला लागू होतं. एक चांगला पीआर दोन्ही बाजूंनी एकमेकांना समजून घेण्यास आणि परस्पर सौहार्द आणि एकमेकांबद्दल आदर राखण्यास मदत करण्यास सक्षम असावा. दुसऱ्या बाजुने एक वाईट पीआर संकट किंवा संघर्ष आणि असंतोष निर्माण करतो.

देशात संवाद कौशल्य नसलेले लाखो युवक

आपल्या देशात असे लाखो युवक आहेत ज्यांच्याकडे संवाद कौशल्य नाही, जे त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास साधण्याच्या क्षमतेमध्ये अडथळा आणतात. वैयक्तिक विकास कौशल्य, नेतृत्व प्रशिक्षण, ग्राहक सेवा आणि वादविवाद, चर्चा आणि इतर संबंधित विषयांमध्ये व्यावहारिक प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ गुंतले आहेत, असं पिल्लई म्हणाले.

पुरस्कारांचं वितरण

यावेळी राज्यपालांनी विविध पुरस्कार प्रदान केले ज्यात आजीवन यश, दशकातील संवाद, जनसंपर्क व्यावसायिक, चांगले प्रशासन आणि व्यवस्थापन व्यवसाय दळणवळण, पत्रकारिता, उत्कृष्ठ तरुण संवादक, हॉल ऑफ फेम पुरस्कार आणि YCC कौटिल्य पुरस्कार यांचा समावेश आहे. राज्यपालांनी पीआरसीआय आणि वायसीसीच्या चाणक्य आणि कौटिल्य मासिकांचे प्रकाशन केलं आणि पीआरसीआयच्या प्रकाशन विभागाने प्रकाशित केलेल्या संवादावरील पुस्तकाचंही प्रकाशन केलं.

या कॉन्क्लेव्हमध्ये संपूर्ण भारतातील कॉर्पोरेट मानदंड, मीडिया दिग्गज, एचआर, मार्कोम, शैक्षणिक, इव्हेंट मॅनेजमेंट, जाहिरात व्यावसायिक आणि दळणवळण तज्ज्ञ सहभागी होत आहेत.

या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक एम.बी. जयराम यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. प्रशासकीय परिषद अध्यक्ष बी. श्रीनिवास मूर्ती, पीआरसीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष, डॉ टी. विनयकुमार, पीआरसीआय; वायसीसी बोर्डाच्या अध्यक्ष गीता शंकर यावेळी उपस्थित होत्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!