राज्याच्या अर्थसंकल्पाकडे जनतेचं लक्ष

अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ मार्चपासून; १२ दिवस चालणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ मार्च ते १२ एप्रिल २०२१ या कालावधीत १२ दिवस चालणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यासंदर्भातील समन्स जारी केले आहेत.

हेही पहाः Politics | अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखांवरुन विरोध पक्षनेते दिगंबर कामतांचा निशाणा

हेही पहाः Special Report | खासगी टॅक्सी चालकांनी ठणकावलं गोवा माईल्स बंद करा

मुख्यमंत्र्यांकडून राज्याचा अर्थसंकल्प

अधिवेशनास २४ मार्च रोजी सकाळी ११.३० पासून प्रारंभ होणार आहे. शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी अधिवेशन सत्र होणार नाही. या अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विधानसभा निवडणुकीस केवळ एक वर्ष शिल्लक राहिले आहे. चालू वर्ष निवडणूक वर्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. सावंत अर्थसंकल्पाद्वारे गोमंतकीय जनतेला कशाप्रकारे दिलासा मिळवून देणार, याकडे गोमंतकीय जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत

गेल्या विधानसभा अधिवेशनांत केंद्राचे रेल्वे मार्ग दुपदरीकरण, तमनार विद्युत प्रकल्प, महामार्ग रुंदीकरण हे तीन प्रकल्प, करोना प्रसार, म्हादई नदी, मोपा विमानतळ आदी प्रश्नांवरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं होतं. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही विरोधकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विरोधक पुन्हा याच मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत असल्याचं समजतं. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सरकारने राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी विरोधकांनी याआधीच केली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताच विरोधकांकडून पुन्हा हीच मागणी लावून धरली जाण्याची शक्यता आहे.

हेही पहाः Politics | Reservation Issue | High court | पालिका आरक्षणाचा निकाल कुणाच्या बाजूनं लागणार?

हेही पहाः Illegal | सांकवाळमध्ये कुणाच्या आशीवार्दानं अवैध बांधकाम?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!