स्तनदा मातांना ‘वर्क फ्रॉम होम’ सुविधा द्या ; केंद्राची सूचना

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोविडच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचा संसर्ग वाढू नये, यासाठी केंद्र सरकार पुरेपुर काळजी घेत आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून स्तनदा मातांसाठी घरातुन काम करण्यासंदर्भात एक अतिशच चांगला निर्णय घेण्यात आला आहे.

नोकरदारांच्या हितरक्षणासाठी विशेषतः सध्याच्या महामारीच्या कालखंडात स्तनदा मातांच्या हितार्थ अजून एक निर्णय घेत केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना स्तनदा मातांना वर्क फ्रॉम होम सुविधा देण्यासाठी प्रोत्साहन देण्याची सूचना मातृत्व लाभ (दुरुस्ती) कायदा 2017 च्या कलम 5(5) अन्वये जारी केली आहे.

या कायद्यानुसार स्तनदा मातेचे कामाचे स्वरूप हे घरी राहून करता येण्यासारखे असेल तर तिच्या रोजगारदात्याने तिचे प्रसूती पश्चातच्या कालावधीचे लाभ कायम राखत नंतर घरून काम करण्याची परवानगी परस्पर सहमतीने द्यावी,

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!