आर्थिक मदत द्या; टुरिस्ट गाईडची मागणी

भारतीय पर्यटक गाईड महासंघाच्या गोवा विभागातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा: करोना महामारीमुळे पर्यटक गाईड्सवर आर्थिक संकट ओढवलं आहे. सरकारने पर्यटक गाईडना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भारतीय पर्यटक गाईड महासंघाच्या गोवा विभागातर्फे निवेदनाद्वारे केली आहे.

हेही वाचाः मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून पैकुळवासिसांयासाठी तयार झाला पर्यायी रस्ता

मुख्यमंत्र्यांना सादर केलं निवेदन

यासंदर्भात महासंघाच्या सदस्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर यांना निवेदन सादर केलं आहे. करोना महामारीच्या काळात पर्यटन उद्योगासह टुरिस्ट गाईडस् यांना बराच फटका बसला आहे. मार्च २०१९ पासून टुरीस्ट गाईड बेरोजगार झाले आहेत.

हेही वाचाः सरकार ऐकलं तर ठीक, नाहीतर आझाद मैदानावर जमून आंदोलन करावंच लागेल!

टुरीस्ट गाईड्सना उपजिवीकेसाठी आर्थिक मदत करा

महासंघाच्या गोवा विभागाचे अध्यक्ष ज्ञानदीप वळवईकर म्हणाले, टुरिस्ट गाईड हे पर्यटनाचा वास्तविक चेहरा आहे. मागील २० ते ३० वर्षांपासून या उद्योगावर आम्ही आमचा उदारनिर्वाह करीत आहोत. पण करोना महामारीमुळे आता आमच्याकडे जगण्यासाठी उत्पन्नाचं कोणतंही साधन नाही. अशावेळी पर्यटन उद्योगावर अवलंबून असलेल्या टूरिस्ट गाईड आणि त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती समजून घेताना देशातील काही राज्यांनी खासकरून कर्नाटक, केरळ, ओडिशा यांनी टुरीस्ट गाईड्सना उपजिवीकेसाठी आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे याच धर्तीवर राज्यातील गाईड्सना आर्थिक मदत करावी, अशी विनंती वळवईकर यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

हा व्हिडि़ओ पहाः Video | Politics | BJP Goa | जे पी नड्डा यांचं गोव्यात दणक्यात स्वागत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!