PROUD MOMENT | राजतिलक नाईक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजीः राज्यातील छायापत्रकार तथा गोवा पत्रकार संघ (गूज) चे अध्यक्ष राजतिलक नाईक यांनी ६४ व्या फोटोग्राफिक सोसायटी ऑफ श्रीलंका आयोजित स्पर्धेत प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय फोटोग्राफिक युनियन पदक जिंकल्याबद्दल गोवा विधानसभेत त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो यांनी हा अभिनंदनाचा प्रस्ताव आणला होता.
हेही वाचाः Tokyo Olympics 2021: डिस्कस थ्रोच्या फायनलमध्ये भारताची कमलप्रीत कौर
५० हून अधिक देशांतील सुमारे ४५०० स्पर्धकांनी स्पर्धेत घेतला भाग
६४ व्या फोटोग्राफिक सोसायटी ऑफ श्रीलंका यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय फोटोग्राफिक युनियन पदकासाठी ५० हून अधिक देशांतील सुमारे ४५०० स्पर्धकांनी भाग घेतला होता. पणजीतील कृष्ण जन्माष्टमीच्या सणानिमित्त एक मुस्लिम महिला आपल्या मुलाला भगवान श्रीकृष्णाच्या वेशभूषेत घेऊन जात होती, असा फोटो राजतिलक नाईक यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला होता. देशातील सर्व धर्मांमध्ये जातीय सलोख्याचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा एक मजबूत संदेश छायाचित्रांद्वारे राजतिलक नाईक यांनी दिल्यामुळे त्यांना हे प्रतिष्ठेचं पदक प्राप्त झालं आहे.
ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन
राजतिलक नाईक यांना हे प्रतिष्ठेचं पदक मिळाल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्विट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे. ट्विट करताना मुख्यमंत्री म्हणालेत, आंतरराष्ट्रीय फोटोग्राफिक युनियन पदक हे प्रतिष्ठेचं पदक प्राप्त केल्याबद्दल राजतिलक नाईक यांचं हार्दिक अभिनंदन.
Hearty congratulations to Rajtilak Naik on winning the prestigious "Global Photographic Union (GPU) Medal Award". pic.twitter.com/kihF5NyycZ
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) July 31, 2021
राजतिलक नाईक हे राज्यातील एका प्रतिष्ठित इंग्रजी वृत्तपत्रासाठी मुख्य छायाचित्रकार म्हणून सेवा बजावत असून ते गोवा पत्रकार संघ (गूज) चे अध्यक्ष म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी आहे. त्यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पदकाबद्दल ‘गोवन वार्ता लाईव्ह’च्या टीमकडून त्यांचं अभिनंदन!