मेळावलीमध्ये तणाव! पोलिसांसमोर आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी

देविदास गावकर | प्रतिनिधी
सत्तरी : मेळावलीमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय. सोमवारी रात्री मेळावतीली ग्रामस्थांनी मदतीची साद घातली होती. त्यानंतर मोठ्या संख्येनं ग्रामस्थ मेळावलीच्या मुख्य रस्त्यावर जमू लागलेत.
आयआयटीविरोधात मेळावलीवासियांचं आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यताय. मंगळवारी सकाळपासून मेळावतीली ग्रामस्थांनी मशाल पेटवून आपलं आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराच सरकारला दिलाय. सकाळीच या गावातील महिलांनी दारुचं दुकान बंद करायला भाग पाडलंय. दुकानदाराला समज दे आंदोलक महिलांनी चांगलंच सुनावलंय.
हेही वाचा – कोरोना लसीमुळे नपुंसकत्व येतं?
या आंदोलनात प्रामुख्यानं महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून येतोय. आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केलंय. दरम्यान, महत्त्वाचं म्हणजे काल रात्री नेमकं मेळावतीली ग्रामस्थांनी गोमंतकीयांना साद घातली होती. आमच्यावर संकट आलं असून साडेपाचशे पोलिस आम्हाला अटक करायला येणार असल्याची माहिती मिळाल्याचा दावा सूत्रांच्या हवाल्यानं मेळावलीतील लोकांनी केला होता. त्यानंतर त्यांनी संपूर्ण राज्यातील जनतेला मदतीचं आवाहन केलं होतं.
हेही वाचा – डायरेक्ट चंद्रार फेम महादेव जोशी यांच्या निधनानं अनेकजण हळहळले
दरम्यान, पोलिसही या भागात दाखल झालेत. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीही केली आहे. गेले अनेक महिने मेळावलीतील लोकं आयआयटीविरोधात आंदोलन करत आहेत. हे आंदोलन आणखी पेटण्याची शक्यताय.
पहा व्हिडिओ 👇🏻
पंचनामा – आयआयटीला मेळावतील लोकांचा नेमका का आहे विरोध?
आनंदाची बातमी! महागाई भत्त्यामध्ये नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात वाढ