रेल्वेदुपदरीकरणाविरोधात संघर्ष! मध्यरात्री जनसागर उसळला!

रेल्वे ट्रॅकवर बसूनही निदर्शनं

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : रविवारची (1 नोव्हेंबर) रात्र ऐतिहासिक रात्र ठरली. या रात्री चांदरमध्ये प्रचंड मोठा मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सरकारविरोधात प्रचंड रोष यावेळी पाहायला मिळाला. मोठ्या संख्येनं लोक यावेळी मध्यरात्री मेणबत्ती हातात घेऊन रस्त्यावर उतरले होते.

गोयांत कोळसो नाका संघटनेतर्फे हा मोर्चा काढण्यात आला होता. गोयांत कोळसो नाका संघटनेचे निमंत्रक अभिजीत प्रभूदेसाई यांच्या नेतृत्त्वाखाली लोकांनी हा भव्य मेणबत्ती मोर्चा काढला. यावेळी सरकारविरोधात निदर्शनं करण्यात आली. रेल्वे दुपदरीकरणाच्या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच कडाडून विरोध होतोय. या विरोधातने रविवारी मध्यरात्री तीव्र रुप धारण केल्याचं पाहायला मिळालं. रेल्वे ट्रॅकवर बसूनही यावेळी निदर्शनं करण्यात आली आहे.

आपनेही या आंदोलनात आपल्या कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचं आवाहन शनिवारी केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलं होतं. राजकारण बाजूला ठेवून गोयकार या नात्यानं आंदोलनात उतरण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं.

कोळसाही नको आणि नेतेही!

विशेष म्हणजे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या राजकीय नेत्यांना आंदोलकांनी सुनावलंय. तुमची आम्हाला गरज नाही, असं म्हणत त्यांनी या राजकीय नेत्यांना परतावून लावलं. हा लोकलढा असून आम्ही तो तुमच्याशिवाय लढू शकतो आणि जिंकू शकतो, असा विश्वासही आंदोलकांनी व्यक्त केला. तुम्ही केवळ राजकारण करण्यासाठी इथे आलेला आहात, असे खडे बोल आंदोलकांनी यावेळी राजकीय नेत्यांनी सुनावलेत. स्थानिक आंदोलकांनी यावेळी रात्रभर रेल्वेदुपदरीकरणाविरोधात ठिय्या आंदोलन केलंय. आगामी काळात हा विषय आणखी पेटण्याची शक्यताय.

पाहा व्हिडीओ

आंदोलन पेटण्यास कधी सुरुवात झाली?

दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी नेसाई, चांदर आणि दवर्लीतल्या रेल्वे दुपदरीकरणाच्या कामासाठी रस्ता बंदचे आदेश जारी केले होते. त्यानंतर कोळसा विरोधी आंदोलन तीव्र झालं. 27 ऑक्टोबरला रात्री पोलिस बंदोबस्तात या कामाला सुरुवातही करण्यात आली होती. त्यावेळी तातडीनं हे काम थांबवण्यासाठी लोकांनी निदर्शनं केली. तेव्हापासून लोकांनी याविरोधात लढा द्यायला सुरुवात केली. मात्र तरीही काम सुरुच राहिल्यानं हे प्रकरण आता आणखी चिघळण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

हेही वाचा –

बोल बिनधास्त | गोंयकरांवर प्रकल्प लादले जातायत का?

बोल बिनधास्त | कोळसा गोव्याची राख करणार अशी भीती लोकांना का वाटते?

हेही पाहा –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!