राज्य नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना बढती

१७ अधिकाऱ्यांचा समावेश; अधिकृत आदेश जारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोव्याच्या नागरी सेवेतून एक बातमी हाती येतेय. राज्य नागरी सेवेतील 17 अधिकाऱ्यांच्या बढतीचा आदेश जारी करण्यात आला आहे. वरिष्ठ श्रेणी अधिकाऱ्यांची कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत बढती करण्यात आलीए असं समजतंय. गोवा लोकसेवा आयोगाने दिलेल्या विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीवर हे बढतीचे आदेश जारी करण्यात आले असल्याचं जारी केलेल्या आदेशात म्हटलंय.

हा व्हिडिओ पहाः Video | Heavy Rain | मुसळधार पावसाने कासारवाणे चांदेल मार्ग जलमय

या 17 अधिकाऱ्यांना मिळाली बढली

राज्य नागरी सेवेतील बढती झालेल्या 17 अधिकाऱ्यांमध्ये बिजू नाईक, सुरेंद्र नाईक, जॉन्सन फर्नांडिस, अजित पंचवाडकर, आग्नेल फर्नांडिस, दशरथ रेडकर, नारायण गाड, देविदास गावकर, फ्लोरिना कुलासो, अजित पावसकर, सिद्धी हळर्णकर, स्नेहल नाईक गोलतेकर, विनायक वळवईकर, मेघना शेटगावकर, दर्शना नारुलकर, आशुतोष आपटे, पराग नगर्सेकर यांचा समावेश आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | Oppourtunity | Skill Development | ३० कंपन्यांमध्ये दीड हजार जणांची निवड होणार

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!