पंक्ती जोग यांचा प्रो. विप्लव हालीम पुरस्काराने सन्मान

देशभरातून या पुरस्कारासाठी फक्त तीन समाजसेवी संस्थांची निवड

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: गुजरात येथील माहिती अधिकार २००५ या कायद्याबाबत समाजसेवी कार्य करणारी संस्था माहिती अधिकार गुजरात पहेल (राष्ट्रीय माहिती अधिकार हेल्पलाईन) च्या संस्थापक संचालक सोनाळ सत्तरी येथील पंक्ती जोग यांना गुजरात येथील प्रो. विप्लव हालीम पुरस्कार प्राप्त झाला. देशभरातून यासाठी फक्त तीन समाजसेवी संस्थांची निवड करण्यात आली होती.

गेली २२ वर्षं जनपथ या समाजसेवी संस्थेतून कार्यरत

पंक्ती जोग या गेली २२ वर्षं जनपथ या अतिशय मोठ्या समाजसेवी संस्थेत सहसंचालक पदावर कार्यरत आहेत. देशभरातील सुमारे ४०० संस्थांच्या नोडल पदावर त्यांचं कार्य आहे. तसंच ‘माहिती अधिकार गुजरात पहेल’ या संस्थेच्या त्या संस्थापक संचालक आहेत.

माहिती अधिकारावर देशभरात मार्गदर्शन कार्यशाळांचं आयोजन

माहिती अधिकार गुजरात पहेल ही आरटीआय २००५ या विषयात देशभरातील अग्रगण्य अशी समाजसेवी संस्था मानली जाते. सरकारी अधिकारी वर्ग ते सामान्य जनता यांना माहिती अधिकारावर देशभरात पंक्ती जोग या मार्गदर्शन कार्यशाळा घेतात तसंच ‘आरटीआय क्लिनिक’ द्वारे गावातील, आदिवासी भागातील जनतेचे सबलीकरण करण्याच्या योजना राबवतात. एका गोमंतकीय तरुणीने गेल्या २२ वर्षांच्या आपल्या योगदानाने देश – विदेशातूनही अनेक सन्मान मिळवले आहेत.

१९९८ पासून ‘जनपथ गुजरात’ येथे कार्यरत

पंती जोग सत्तरी तालुक्यातील कन्या असून यापूर्वी त्या समुद्र विज्ञान संस्था दोनापावल येथे कनिष्ठ वैज्ञानिक होत्या. १९९८ पासून त्या पूर्णवेळ समाजसेवी संस्था ‘जनपथ गुजरात’ येथे कार्यरत झाल्या.

हा व्हिडिओ पहाः Ganesh Visarjan | गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!