प्रो. एम के जनार्थनम गोवा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी नियुक्त

इतिहासात प्रथमच गोवा विद्यापीठात कुलगुरूपदासाठी सुमारे २८० जणांचे अर्ज

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः प्रो.एम के जनार्थनम यांची गोवा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आलीये. गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. वरुण साहनी यांचा कार्यकाळ बुधवारी संपला आहे. नव्या कुलगुरूंची नेमणूक होईपर्यंत एका वरिष्ठ प्राध्यापकाची कुलगुरुपदी नेमणूक होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार प्रो. जनार्थनम यांची नियुक्ती करण्यात आलीये.

हेही वाचाः Sunanda Pushkar Case : सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणातून काँग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता

प्रो. एम.के. जनार्थनम यांचं पूर्ण नाव मालापती जनार्थनम आहे. ते गोवा विद्यापीठात वनस्पतिशास्त्र (बॉटनी) विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी वनस्पतीशास्त्र विषय घेऊन पीएचडी पूर्ण केली आहे. एंजियोस्पर्मची पद्धतशीरता (Systematics of Angiosperms) हा त्यांचा स्पेशलाइजेशनचा विषय आहे. २००५ साली त्यांना आयएएटीचे प्रो. व्ही.व्ही. शिवराजन गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आलं आहे.

वरुण साहनी यांचा कार्यकाळ संपुष्टात

वरुण साहनी यांची २०१६ मध्ये गोवा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नेमणूक करण्यात आली होती. बुधवारी त्यांची मुदत संपत आहे. शिवाय त्यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्तावही नसल्यामुळे नव्या कुलगुरूंची निवड होईपर्यंत प्रभारी कुलगुरुपदी एका वरिष्ठ प्राध्यापकाची नेमणूक होणार आहे.

हेही वाचाः BREAKING| अश्लिल चित्रपट प्रकरणात राज कुंद्राला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

कुलगुरूपदासाठी सुमारे २८० जणांचे अर्ज

दरम्यान, इतिहासात प्रथमच कुलगुरूपदासाठी सुमारे २८० जणांचे अर्ज आले आहेत. विद्यापीठाच्या छाननी समितीने त्यांतील सुमारे २५ जणांची निवड मुलाखतीसाठी केली आहे. यात गोवा विद्यापीठातील दोन प्राध्यापकांचा समावेश आहे. कुलगुरुपदासाठी अर्ज केलेल्यांमध्ये गोवा, काश्मीर, महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, केरळ अशा अनेक राज्यांतील उमेदवारांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या छाननी समितीने ज्या पात्र उमेदवारांची यादी मुलाखतीसाठी निवडली आहे, त्यांच्या मुलाखती १४ ऑगस्टपासून सुरू झाल्या आहेत. तीन सदस्यीय निवड समितीकडून मुलाखतीअंती पाच नावांची शिफारस अंतिम यादीत केली जाईल. छाननी समितीत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळाचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे, एनसीईआरटीचे माजी संचालक प्रो. जगमोहन सिंग राजपूत आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांचा समावेश आहे.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | FREE WATER | मोफत पाणी देण्याचा प्रस्ताव माझ्याच कार्यकाळातला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!